Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या खेळाडूंवर सूर्यकुमारचा विश्वास, प्लेइंग 11 बाबत म्हणाला…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. हा निर्णय भारताच्या मनासारखा झाला. या सामन्यात भारताची प्लेइंग 11 निवडताना सूर्यकुमार यादवने अशी रणनिती आखली आहे.

आशिया कप स्पर्धेतील सर्वात चर्चेत असलेला भारत पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होत आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान धावा देईल त्या गाठायचं आव्हान असणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या मनासारखा निर्णय झाला असंच म्हणावं लागेल. कारण नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर प्रथम गोलंदाजी केली असती त्याने सांगितलं. त्यामुळे हा निर्णय भारताच्या मनासारखा झाला आहे. या सामन्यात खेळाडूंवरही दडपण असणार आहे. खासकरून टीम इंडियाच्या खेळाडूंवर विजयाचं मोठं दडपण असेल. कारण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. त्यामुळे एकीकडे भारतीयांचा विरोध आणि दुसरीकडे विजयाचं दडपण असं दुहेरी दबाब खेळाडूंवर असेल. दरम्यान, या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेइंग 11 निवडताना काळजी घेतली आहे. कोणत्या 11 खेळाडूंवर विश्वास टाकला आहे याबाबत क्रीडाप्रेमींना उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात नाणेफेकीनंतर पाकिस्तानचा कर्णधाल सलमान आघा आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला आणि कसं काय असेल ते
सलमान आगा नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर म्हणाला की, ‘प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत, खूप उत्साहित आहोत. खेळपट्टी संथ दिसतेय. फक्त प्रथम फलंदाजी करून धावा काढायच्या आहेत. त्याच संघासह खेळणार आहोत. गेल्या 20 दिवसांपासून इथे आहे आणि परिस्थितीची सवय झाली आहे.‘ तर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो, त्यामुळे आम्ही समाधानी होतो. आम्ही फक्त एका स्ट्रिपच्या अंतरावर खेळलो, एक चांगली खेळपट्टी होती आणि रात्री फलंदाजीसाठी चांगली होती. दमट आहे म्हणून काही दव पडण्याची आशा आहे. तीच टीम घेऊन खेळणार आहोत.‘
दोन्ही संघांची प्लेइंग
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद
