AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ पाकिस्तानी खेळाडूच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज गारद, एका डावात घेतले 8 विकेट्स 

भारतीय क्रिकेट संघातील आठ फलंदाजाना केवळ 69 धावा देत तंबूत परतवणारा हा पाकिस्तानीस गोलंदाज अत्यंत वेगात बोलिंगर करत होता. त्याने पाकिस्तान संघाला काही महत्त्वाचे विजय गोलंदाजीच्या जोरावर मिळवून दिले होते.

'या' पाकिस्तानी खेळाडूच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज गारद, एका डावात घेतले 8 विकेट्स 
सिकंदर बख्त
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 11:48 AM
Share

कराची : क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्‍तान (India vs Pakistan) यांच्यातील टक्‍कर कायमच रोमहर्षक असते. या सामन्यांमध्ये दोन्ही संघाचे अनेक खेळाडू धडाकेबाज कामगिरी करतात. ज्या कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. अशीच एक स्मरणीय कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज पाकिस्तान संघात (Pakistan Cricket Team) होता. या खेळाडूने भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांना पुरतं पछाडून सोडलं होतं. एकदा गोलंदाजीदरम्यान त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला असा काही बाऊन्सर टाकला की त्याचा हातच फ्रॅक्चर झाला होता. या खेळाडूंच नाव सिकंदर बख्‍त (Sikander Bakht) असं असून आज त्याचा वाढदिवस असल्याने त्याच्याबाबत थोडं जाणून घेऊ…

पाकिस्‍तान क्रिकेट संघाचा या खेळाडूचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी, 1957 साली झाला होता. उंच बांध्याचा हा वेगवान गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत फलंदाजाना अक्षरश: घाम फुटत असे. आउटस्विंगर चेंडू टाकणारऱ्या सिंकदरने 1979 ते 80 मध्ये दिल्‍ली येथील कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगलच सतावलं होतं. याचवेळी त्याने एका डावात 69 धावा देत आठ विकेट्स पटकावले होते.

26 कसोटी सामन्यांचा अविस्मरणीय प्रवास

सिकंदर बख्‍तने केवळ 26 कसोटी सामने खेळले. पण इतक्यातही त्याने आठवणीतले काही सामने खेळले ज्यामुळे तो कायम प्रत्येकाच्या स्मरणात आहे. त्याने कराचीमध्ये खेळलेल्या एका सामन्यात वेगवान गोलंदाजी करताना एका बाऊन्सरने इंग्‍लंडचा फलंदाज माइक ब्रेयरलीचा हातच तोडला होता. त्याने 26 कसोटी सामन्यात 6.34 च्या सरासरीने 146 धावा केल्या. तर 67 फलंदाजाना तंबूत धाडलं. 69 धावा देत आठ विकेट्स घेणं हे त्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन होतं.

इतर बातम्या

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

IND vs ENG : इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, आणखी एक खेळाडू तिसऱ्या कसोटीला मुकणार, गोलंदाजी विभागाच्या अडचणी वाढल्या

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय पक्का, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली 5 महत्त्वाची कारणं

(Pakistan fast Bowler Sikander bakht birthday on this day)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.