Asia Cup मध्ये भारताविरुद्ध सामन्याची तारीख जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने निवडला ‘तगडा’ संघ

| Updated on: Aug 03, 2022 | 12:50 PM

Asia Cup: आशिया कप स्पर्धेसाठीच वेळापत्रक काल जाहीर झालं. भारत आणि पाकिस्तान मध्ये 28 ऑगस्टला सामना रंगणार आहे.

Asia Cup मध्ये भारताविरुद्ध सामन्याची तारीख जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने निवडला तगडा संघ
pakistan team
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: आशिया कप स्पर्धेसाठीच वेळापत्रक काल जाहीर झालं. भारत आणि पाकिस्तान मध्ये 28 ऑगस्टला सामना रंगणार आहे. काल स्पर्धेच वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने आशिया कप 2022 साठी संघाची घोषणा केली आहे. टीम मध्ये एकूण 15 खेळाडूंना निवडण्यात आलं आहे. संघाचं नेतृत्व बाबर आजमच्या हाती आहे. स्पर्धेच वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने संघाची निवड केली. आशिया कप मध्ये पाकिस्तानला भारता विरुद्ध कधी खेळायचं आहे? आणि दुसऱ्या संघांविरुद्ध त्यांचे सामने कधी आहेत, ते स्पष्ट आहे. आशिया कपसाठी आपला संघ कसा असेल? ते पाकिस्तानने जाहीर केलय.

नेदरलँडस विरुद्ध सीरीजसाठीही संघाची घोषणा

आशिया कपसाठी टीम निवडण्याशिवाय पाकिस्तानने नेदरलँडस विरुद्ध वनडे सीरीजसाठी सुद्धा 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. नेदरलँडस आणि पाकिस्तान मध्ये 16 ते 21 ऑगस्ट दरम्यान वनडे सीरीज होईल. आशिया कप 2022 चं आयोजन 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान UAE मध्ये होईल.

हसन अलीचा पत्ता कट, नसीम शाहचा रस्ता मोकळा

पाकिस्तानने आपला युवा गोलंदाज नसीम शाहला नेदरलँडस आणि आशिया कप दोन्ही टीम्स मध्ये स्थान दिलं आहे. हसन अलीच्या जागी त्याला ही संधी मिळाली आहे. त्याशिवाय दुखापतीमधून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीला दोन्ही संघात स्थान मिळालय.

आशिया कपसाठी पाकिस्तानने 15 खेळाडू निवडले

बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, आसिफ इली, फख्र जमां, हैदर अली, हैरिस रउफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जू., नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर

नव्या चेहऱ्यांना संधी

नेदरलँडस विरुद्ध वनडे सीरीजसाठी अब्दुल्लाह शफीक, इमाम उल-हक, मोहम्मद हॅरिस, सलमान अली आगा आणि जाहिद महमूदची निवड झालीय. आशिया चषकासाठीच्या संघात आसिफ अली, हैदर अली, इफ्तिकार अहमद आणि उस्मान कादिर यांची निवड केली आहे.