पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा तोंडावर आपटला, आता युएईसोबत सामना खेळण्याची तयारी

आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तान युएई सामन्यापूर्वी ड्रामा पाहायला मिळाला. या सामन्यात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट असल्याने त्यांनी सामना खेळण्यास नकार दिला. मात्र पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पलटी मारली आणि निर्लज्जपणे सामना खेळण्यासाठी मैदानाकडे रवाना झाले.

पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा तोंडावर आपटला, आता युएईसोबत सामना खेळण्याची तयारी
पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा तोंडावर आपटला, आता युएईसोबत सामना खेळण्याची तयारी
Image Credit source: ACC
| Updated on: Sep 17, 2025 | 7:51 PM

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि त्यांचा संघ एका नाटक कंपनीप्रमाणे वागत असल्याचं दिसत आहे. आशिया कप 2025 स्पर्धेतील 10वा सामना पाकिस्तान आणि यजमान युएई यांच्यात होता. पण या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे नखरे सुरु झाले. सामन्यात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट असतील तर आम्ही खेळणार नाही वगैरे.. त्यामुळे त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने संघाने नाटकी दाखवत सुरुवातीला हॉटेलमधून बाहेर आले नाहीत. त्यानंतर पाकिस्तान मीडियाने दावा केला की, त्यांचा संघ युएईसोबत खेळणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचा संघ हॉटेलवरच थांबला होता. पण आता पुन्हा एकदा निर्लज्जपणे सामना खेळण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दावा केला की, हा सामना आता एक तास उशिराने सुरु होईल. जर सामना खेळायचाच होता तर इतकी नाटकी करण्याची काय गरज होती? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी विचारत आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरूद्धच्या सामन्यानंतर आयसीसीकडे अँडी पायक्रॉफ्ट यांची तक्रार केली. त्यांची स्पर्धेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली. पण आयसीसीने त्याला नकार दिला. तसेच या सामन्यात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टच असतील असं स्पष्ट केलं. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली. त्यानंतर पाकिस्तान मीडियाने वृत्त दिलं की, पाकिस्तान संघ आता हॉटेलमधून स्टेडियमकडे रवाना झाला आहे. एक तास उशिराने हा सामना सुरु होईल. पीसीबी अध्य मोहसिन नक्वी आणि रमीझ राजा यांच्यात चर्चा सुरु आहे. पाकिस्तानने आयसीसीकडे दोन मागण्या ठेवल्या आहेत.

पहिली मागणी अशी की, भारत पाकिस्तान सामन्यात सामनाधिकारी असलेले अँडी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागावी. दुसऱ्या मागणीत त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला दंड ठोठावा. कारण त्याने पहलगामचा उल्लेख करत राजकीय रुप दिलं. या दोन अटी मान्य झाल्यानंतर पाकिस्तान संघ खेळेल असं पाकिस्तान मिडिया सांगत आहे. दरम्यान, पाकिस्तानने हा सामना खेळला नाही तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. युएईला सुपर 4 फेरीचं तिकीट मिळेल. इतकं सगळं होत असताना प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानवर मान शरमेने खाली घालण्याची वेळ येत आहे. मात्र अशी सवयच असल्याने त्यांना तसा काही फरक पडत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निर्लज्जसारखे मैदानाकडे रवाना झाले आहेत.