AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs UAE: पाकिस्तान युएई सामना रद्द? आशियाई क्रिकेट परिषदेच्या हालचालीनंतर खळबळ

आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ तिसरा सामना खेळणार की नाही याबाबत आता वादळ उठलं आहे. भारताने हँडशेक न केल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली. त्यातच पायक्रॉफ्ट यांना सामनाधिकारी म्हणून कायम ठेवल्याने पाकिस्तानची लाज गेली आहे. असं असताना पाकिस्तान युएई सामना होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

PAK vs UAE: पाकिस्तान युएई सामना रद्द? आशियाई क्रिकेट परिषदेच्या हालचालीनंतर खळबळ
PAK vs UAE: पाकिस्तान युएई सामना रद्द? आशियाई क्रिकेट परिषदेच्या हालचालीनंतर खळबळImage Credit source: ACC
| Updated on: Sep 17, 2025 | 6:15 PM
Share

आशिया कप स्पर्धेतील 10वा सामना पाकिस्तान आणि युएई यांच्यात होत आहे. पण हा सामना बऱ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कारण सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट हे पुढच्या सामन्यात असतील तर पाकिस्तान खेळणार नाही असं तक्रारीत नमूद केलं होतं. पण आयसीसीने त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे पाकिस्तानवर नामुष्की ओढावली आहे. असं असताना या सामन्यापूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेने एका पाऊल उचललं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने पाकिस्तान आणि युएई यांच्यातील सामन्याची ट्वीटर पोस्ट डिलिट केली आहे. त्यामुळे हा सामना होईल की नाही याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. कारण पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. आता तक्रारीला केराची टोपली दाखवल्यानंतर पाकिस्तानने पुढचा सामना खेळणार नाही असा पवित्रा घेतल्याची चर्चा रंगली आहे.

आशियाई क्रिकेट परिषद ही सामन्यापूर्वी ट्वीटर हँडलवर त्या त्या सामन्याची पोस्ट टाकत असते. पण पाकिस्तान युएई सामन्याची पोस्ट डिलिट केल्याने संभ्रम वाढला आहे. पाकिस्तानचा संघ मैदानात जाण्यासाठी तसं पाहीलं तर फार वेळ नाही. पण अजूनही सर्वकाही अनिश्चित दिसत आहे. इतकंच काय तर पाकिस्तानने मंगळवारी होणारी पत्रकार परिषदही रद्द केली होती. यामुळे अनिश्चितता वाढली होती. पण पाकिस्तानने आयसीसी क्रिकेट अकादमीत जोरदार सराव केला होता. त्यामुळे पुढे काय होतं याची उत्सुकता वाढली आहे.

Emirates Asia Cup Cricket

आयसीसीने पीसीबीच्या तक्रारीचं काहीच केलं नाही, त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पीसीबीने आयसीसीला दुसरं पत्र लिहिलं आहे. त्यांनी पायक्रॉफ्ट यांना सामनाधिकारी म्हणून सामन्यात ठेवू नये अशी मागणी केली आहे. आता त्यावर काय उत्तर येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ऐन मोक्याच्या क्षणी पायक्रॉफ्ट यांना हटवणार की तेच असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पाकिस्तानने हा सामना खेळला नाही तर युएईला सुपर 4 चं तिकीट मिळणार आहे.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.