Shahid Afridi याला पाकिस्तानमध्ये पळवून पळवून तुडवला, व्हीडिओ व्हायरल

Shahid Afridi Viral Video : शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानमध्ये त्याच्याच देशवासियांनी चांगलाच चोप दिला. आफ्रिदीला चोप देतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा.

Shahid Afridi याला पाकिस्तानमध्ये पळवून पळवून तुडवला, व्हीडिओ व्हायरल
shahid afridi pakistan former cricketer
Image Credit source: Neville Hopwood/Getty Images
| Updated on: May 01, 2025 | 10:49 PM

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याला अकलेचे तारे तोडण्याची सवयच झालीय. आफ्रिदीने आतापर्यंत अनेकदा अकलेचे प्रदर्शन केलंय. त्यामुळेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कायमच आफ्रिदीची फिरकी घेतली जाते. शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन भारतावर गंभीर आरोप केले होते. आफ्रिदीच्या या आरोपांवरुन टीम इंडियाची माजी क्रिकेट शिखर धवन याने आफ्रिदीची लायकी काढली. त्यानंतर आता सोशल मीडियावर आफ्रिदीचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हीडिओत पाकिस्तानमधील लोकं आफ्रिदीची धुलाई करत आहे.

आफ्रिदीची धुलाई करत असल्याचा व्हीडिओ हा शिखर धवन या फेक अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हीडिओत आफ्रिदीने त्याच्या चाहत्याला कानशि‍लात लगावली होती. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांनी आफ्रिदीला चांगलाच तुडवला होता. पाकिस्तानमधील लोकांनी आफ्रिदीला पळवून पळवून हाणला होता. आफ्रिदी तिथून कसा तरी निघून गेला. मात्र काही लोकांनी त्याला मागून फटकावला.

व्हायरल व्हीडिओ केव्हाचा?

शाहिदी आफ्रिदी याला चोप देतानाचा व्हायरल झालेला व्हीडिओ हा 23 मार्च 2012 रोजीचा असल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा पाकिस्तान पराभूत होऊन मायदेशी परतली होती. तेव्हा चाहत्यांनी आफ्रिदीला विमानतळावर घेरलं होतं. तेव्हा एकाने केलेल्या कमेंटमुळे आफ्रिदी भडकला. संतापलेल्या आफ्रिदीने त्या चाहत्याला कानशिलात लगावली. त्यानंतर आफ्रिदीचे चाहते क्रिकेटवर तुटून पडले आणि त्याला लाथाबुक्क्यांचा जोरदार प्रसाद दिला.

पहलगाम हल्ल्यावरुन संतापजनक वक्तव्य

अफ्रिदीने काही दिवसांपूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन संतापजनक प्रतिक्रिया दिली होती. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला होता. भारताने यानंतर पाकिस्तानची सर्वच बाजूने कोंडी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आफ्रिदीने आपल्या अक्कलेचे तारे तोडत भारताबाबत संतापजनक वक्तव्य केलं होतं. “भारतात फटका फुटला तरीही त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवलं जातं. तुमच्याकडे 8 लाख सैन्य आहे, तरीही काश्मीरमध्ये असं झालं. याचा अर्थ तुम्ही नालायक आहात की तुम्ही सुरक्षा देऊ शकलात नाहीत” असं चीड आणणारं वक्तव्य आफ्रिदीने केलं होतं.

आफ्रिदीला असा चोपलेला

शिखर धवनने लाज काढली

आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन याने आफ्रिदीची सोशल मीडियावरुन चांगलीच कानउघडणी केली. “कारगिलमध्ये तुम्हाला धुळ चारली होती. विनाकारण शेरेबाजी करण्यापेक्षा आपल्या देशाच्या विकासासाठी डोकं लाव. आम्हाला आमच्या भारतीय सैन्यावर फार गर्व आहे. भारत माता की जय! जय हिंद!”, अशा शब्दात धवनने हार्दिकला सुनावली होतं.