ICC Test Ranking : पाकिस्तानच्या खेळाडूंची चांदी, वेस्ट इंडिजविरुद्ध विजय, आयसीसी क्रमवारीत भरारी

| Updated on: Aug 25, 2021 | 4:44 PM

पाकिस्तानने वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिकेत 1-1 ची बरोबरी साधली. सामन्यातील अप्रतिम कामगिरीमुळे पाकिस्तानच्या काही खेळाडूंना आयसीसी कसोटी क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे.

ICC Test Ranking : पाकिस्तानच्या खेळाडूंची चांदी, वेस्ट इंडिजविरुद्ध विजय, आयसीसी क्रमवारीत भरारी
पाकिस्तान क्रिकेट संघ
Follow us on

मुंबई : पाकिस्तानने वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटी सामन्यात नमवत कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. 109 धावांनी मिळवलेल्या या विजयाचा फायदा पाकिस्तानच्या खेळाडूंना आयसीसी कसोटी क्रमवारीत भरारी घेण्यासाठी झाला आहे. यावेळी संघाचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) आणि युवा गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. दोघेही टॉप 10 मध्ये पोहचले आहेत.

पाकिस्तानचा 21 वर्षीय गोलंदाज शाहीनने कसोटी क्रमवारीत तब्बल 10 स्थानांची भरारी घेत टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे. शाहीन आठव्या स्थानावर पोहोचला आहे. सामन्यात शाहीनने पहिल्या डावात 51 धावा देत 6 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या डावात केवळ 43 धावा देत त्याने चार फलंदाजांना तंबूत धाडलं. अशारितीने संपूर्ण सामन्यात 94 धावांच्या बदल्यात शाहिनने 10 विकेट मिळवले. त्याच्या या कामगिरीमुळेच कसोटी क्रमवारीत त्याने 783 गुणांसह आठवे स्थान मिळवले आहे.

कर्णधार बाबरने ऋषभ पंतला टाकलं मागे

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने सामन्यात पहिल्या डावात 75 आणि दुसऱ्या डावात 33 धावांची खेळी करत स्वत:ची कसोटी क्रमवारी सुधारली आहे. त्याने भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतला मागे टाकत सातवे स्थान पटकावले आहे. बाबर 749 गुणांवर सातव्या तर पंत 736 गुणांनी आठव्या स्थानावर आहे.

हे ही वाचा

PAK vs WI :पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाची कमाल, एका सामन्यात वेस्ट इंडिजचे 10 विकेट्स घेत मिळवला विजय

पाकिस्तानच्या फवाद आलमने एक शतक ठोकत केले अनेक रेकॉर्ड, ‘या’ गोष्टीत ठरला संपूर्ण आशिया खंडात ‘नंबर 1’

(Pakistans captain babar azam shaheen afridi got better position in ICC test ranking)