पाकिस्तानच्या फवाद आलमने एक शतक ठोकत केले अनेक रेकॉर्ड, ‘या’ गोष्टीत ठरला संपूर्ण आशिया खंडात ‘नंबर 1’

वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान (West Indies vs Pakistan) यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने 109 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 ची बरोबरी साधली. यावेळी फलंदाजीमध्ये फवाद आलमने उत्कृष्ट कामगिरी केली.

पाकिस्तानच्या फवाद आलमने एक शतक ठोकत केले अनेक रेकॉर्ड, 'या' गोष्टीत ठरला संपूर्ण आशिया खंडात 'नंबर 1'
फवाद आलम

मुंबई : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज (Pakistan vs West Indies) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात 109 धावांनी वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार 10 विकेट घेणाऱ्या शाहीन आफ्रिदीला (Shaheen Afridi) देण्यात आला आहे. मात्र पाकिस्तानच्या पहिल्या डावात शतक ठोकत संघाला एक मजबूत आघाडी मिळवून देणारा फवाद आलम (Fawad Alam) याच देखील विजयात तितकचं श्रेय आहे. विशेष म्हणजे या सामन्यातील शतकामुळे त्याने अनेक रेकॉर्ड नावे केले असून एका गोष्टीत त्याने आशियातील सर्व फलंदाजाना मागे टाकले आहे.

35 वर्षीय फवादने सामन्यातील पहिल्या डावात 213 चेंडूत 124 धावा करत अप्रतिम शतक झळकावले. डावखुरा फलंदाज फवादने या खेळीत 17 चौकार लगावले. कसोटी क्रिकेटमध्ये फवादने झळकावलेले हे पाचवे शतक असून विशेष म्हणजे मागील  12 महिन्यांतील त्याचे हे चौथे शतक आहे. या शतकासह सर्वात वेगवान गतीने शतक झळकावणारा फवाद पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे. याआधी भारताच्या चेतेश्वर पुजाराने 24 डावांत पाच कसोची शतक झळकावले होते. त्याला मागे टाकत फवादने 22 डावांत ही कामगिरी केली आहे. पुजारानंतर गांगुली  आणि गावस्कर यांचा नंबर लागतो. त्यांनी 25 डावांत ही कामगिरी केली होती.

फवादचे दमदार पुनरागमन

फवाद आलमने 2009 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती. त्यानंतर वर्षभरापूर्वी त्याचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आणि तेव्हापासून त्याने उत्कृष्ट फलदांजी करत चार शतकं झळकावली आहेत. विशेष म्हणजे त्याने ही सर्व शतकं वेगवेगळ्या देशात झळकावली आहेत. सर्वात आधी त्याने पहिलं कसोची शतक 2009 मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध ठोकलं होतं. 168 धावा करत त्याने हे शतकं झळकावलं होतं. त्यानंतर मागील वर्षभरात त्याने न्यूझीलंड, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिकाआणि वेस्ट इंडीज या देशात शतक झळकावलं आहे.

हे ही वाचा

PAK vs WI :पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाची कमाल, एका सामन्यात वेस्ट इंडिजचे 10 विकेट्स घेत मिळवला विजय

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

IPL 2021 पूर्वीच धोनीने उडवले उंच षटकार, मग स्वत:च गेला झाडात चेंडू शोधायला, पाहा मजेशीर VIDEO

(In West indies vs pakistan match fawad alam hits century and became quickest asian to hit 5 test centuries in 22 innings)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI