18 वर्षांची यशस्वी कारकीर्द, पाकिस्तानी दिग्गज खेळाडूचा 41 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा

| Updated on: Jan 03, 2022 | 12:30 PM

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार मोहम्मद हाफिजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 3 जानेवारी (आज) रोजी पत्रकार परिषद घेऊन ते अधिकृतपणे निवृत्त होणार आहे.

18 वर्षांची यशस्वी कारकीर्द, पाकिस्तानी दिग्गज खेळाडूचा 41 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा
PAKISTAN TEAM
Follow us on

मुंबई : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार मोहम्मद हाफिजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 3 जानेवारी (आज) रोजी पत्रकार परिषद घेऊन ते अधिकृतपणे निवृत्त होणार आहे. मोहम्मद हाफीजची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 18 वर्षे चालली आणि या काळात त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भरपूर यश मिळवले. तो पाकिस्तानच्या यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत तो अखेरचा मैदानात दिसला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असला तरी हाफिज फ्रेंचायझी क्रिकेट खेळत राहील आणि जगभरातील T20 लीगचा भाग असेल. (Pakistan’s Mohammad Hafeez retires from international cricket)

हाफिजने डिसेंबर 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच, 2019 च्या विश्वचषकानंतर, निवडकर्त्यांनी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये त्याची संघात निवड केली नाही. तेव्हापासून, तो केवळ टी-20 फॉरमॅटमध्ये खेळतोय. यामुळे 2021 चा टी-20 वर्ल्ड कप ही त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल, असे हाफिजने म्हटले होते. पण कोरोनामुळे हा विश्वचषक 2021 पर्यंत पुढे गेला, त्यामुळे हाफिजचा वेळही वाढला. हाफीजने एप्रिल 2003 मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ऑगस्ट 2003 मध्ये कसोटी पदार्पण आणि ऑगस्ट 2006 मध्ये T20 पदार्पण केले.

हाफिजची शानदार कारकीर्द

मोहम्मद हफीझने डिसेंबर 2018 मध्ये शेवटची कसोटी, जुलै 2019 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना आणि नोव्हेंबर 2021 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला होता. 2021 च्या T20 विश्वचषकातील पाकिस्तान संघाचाही तो भाग होता. 41 वर्षीय हाफिजने 218 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 शतकांच्या मदतीने 6614 धावा केल्या आहेत आणि 139 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी 55 कसोटींमध्ये त्याने 10 शतकांसह 3652 धावा केल्या आहेत आणि 53 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. 119 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 2514 धावा केल्या आहेत आणि तसेच त्याने 61 विकेट घेतल्या आहेत. हाफिजचा फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही खूप उपयोग झाला. गोलंदाजीतही त्याने अनेक वेळा डावाची सुरुवात केली. त्याचं क्षेत्ररक्षणही अप्रतिम होतं.

6 टी-20 विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग

मोहम्मद हाफिजने आपल्या कारकिर्दीत 32 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. या बाबतीत पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये फक्त शाहिद आफ्रिदी (43), वसीम अक्रम (39) आणि इंझमाम-उल-हक (33) हे त्याच्या पुढे आहेत. हाफिजने नऊ वेळा मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आहे. इम्रान खान, इंझमाम आणि वकार युनूससह पाकिस्तानसाठी तो संयुक्तपणे पहिल्या नंबरवर आहे. मोहम्मद हाफीज हा एकमेव पाकिस्तानी खेळाडू आहे ज्याने 2007 ते 2021 या कालावधीत एक T20 विश्वचषक वगळता बाकी सर्व स्पर्धांमध्ये खेळला आहे. यादरम्यान, तो 2009 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही एक भाग होता. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 2012 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये 29 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आणि त्यापैकी 18 जिंकले आहेत.

इतर बातम्या

IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये शतकांचा दुष्काळ संपणार? नव्या वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी विराट कोहली सज्ज

IND vs SA : जोहान्सबर्गमधून क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी! दुसऱ्या कसोटीवर पावसाचं सावट

‘मी नीट लक्ष देऊन ऐकलं, तो रडण्याचा आवाज माझ्या बायकोचा होता’, अश्विनने सांगितला ऑस्ट्रेलियातला किस्सा

(Pakistan’s Mohammad Hafeez retires from international cricket)