
मेलबर्न: टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) आधी ऑस्ट्रेलियन टीममध्ये मोठा बदल पहायला मिळाला आहे. वनडे फॉर्मेटसाठी (ODI Format) हा बदल करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला (Pat cummins) टेस्ट पाठोपाठ वनडे टीमच कॅप्टन बनवण्यात आलय. कॅप्टनशिपबरोबर कमिन्सच्या खांद्यावर आता वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्याची जबाबदारी आहे.
वनडे वर्ल्ड कप पुढच्यावर्षी होणार आहे. पॅट कमिन्स आधीपासून कसोटी संघाच नेतृत्व संभाळतोय. आता ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप सुरु आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम इंग्लंड विरुद्ध वनडे सीरीज खेळेल. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेपासून पॅट कमिन्स टीमच नेतृत्व संभाळेल. टी 20 मध्ये एरॉन फिंचकडे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व आहे.
कधी निवृत्ती घेतली?
याआधी एरॉन फिंचकडेच ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीमची कॅप्टनशिप होती. पण मागच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने वनडेसाठी नव्या कॅप्टनची नियुक्ती केली.
एरॉन फिंच केर्न्समध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपला शेवटचा 146 वा वनडे सामना खेळला होता. फिंच टी 20 क्रिकेट खेळणं सुरु ठेवेलं.
दोघांकडे दुर्लक्ष
फिंचच्या रिटायरमेंटनंतर डेविड वॉर्नर किंवा स्टीव्ह स्मिथची कॅप्टनशिपपदी वर्णी लागेल, अशी शक्यता होती. पण ऑस्ट्रेलियन निवड समितीने दोघांकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्याजागी पॅट कमिन्सवर विश्वास दाखवला.
वॉर्नर आणि स्मिथच्या कर्णधार बनवण्यावर आजीवन बंदी आहे. त्यांना कर्णधार बनवण्यासाठी नियमांमध्ये बरेच बदल करावे लागले असते.
Pat Cummins has been named Australia’s 27th ODI captain ? pic.twitter.com/T0p02wwjiP
— Cricket Australia (@CricketAus) October 17, 2022
कमिन्स IPL मध्ये खेळतो
पॅट कमिन्स इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळतो. दिल्ली डेयरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स यानंतर आता तो कोलकाता नाइड रायडर्सकडून खेळतो. कमिन्स आतापर्यंत आयपीएलचे 42 सामने खेळला आहे. त्यात त्याने 45 विकेट घेतल्यात. कमिन्स मागच्या सीजनमध्ये केकेआरकडून खेळला होता.