AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023, PBKS vs KKR | पंजाब किंग्सची शानदार बॅटिंग, कोलकाताला 192 रन्सचं टार्गेट

पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 192 धावांचं टार्गेट दिलं आहे. पंजाबकडून भानुका राजपक्षा आणि कर्णधार शिखर धवन या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या.

IPL 2023, PBKS vs KKR | पंजाब किंग्सची शानदार बॅटिंग, कोलकाताला 192 रन्सचं टार्गेट
| Updated on: Apr 01, 2023 | 5:45 PM
Share

मोहाली | आयपीएल 16 व्या मोसमातील पहिल्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य दिलं आहे. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 191 धावा केल्या. पंजाबकडून सर्वच फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र सर्वाधिक धावा या भानुका राजपक्षे आणि कर्णधार शिखर धवन या दोघांनी केल्या. भानुकाने अर्धशतक ठोकलं. भानुकाच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलवहिलं अर्धशतक ठरलं. तर कर्णधार धवन याने फटकेबाजी करत 40 रन्स केल्या.

पंजाबची बॅटिंग

पंजाबकडून प्रभासिमरन सिंह या ओपनर बॅट्समनने 23 धावांची खेळी केली. शिखर धवन याने 29 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 40 रन्स जोडल्या. भानुका राजपक्षा याने 32 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावांचं सर्वाधिक योगदान दिलं. जितेश शर्माने 21 आणि सिकंदर रजा याने 16 धावा केल्या. तर सॅम करन याने नाबाद 26 आणि शाहरुख खान याने नाबाद 11 धावा केल्या.

भानुका आणि शिखर धवन

मोहालीतील 10 सामन्यांमधील निकाल

मोहालीत आयपीएलमध्ये 2018 पासून ते आतापर्यंत एकूण 10 सामने खेळवण्यात आले आहेत. या 10 पैकी 4 वेळा पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर दुसऱ्या डावात 6 वेळा विजयी आव्हानाचं पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झालाय.

दोन्ही संघातील परदेशी खेळाडू

दरम्यान पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू आहेत. कोलकातामध्ये सुनील नरेन, आंद्रे रसेल, टीम साऊथी आणि रहमानुल्लाह गुरबाज हे आहेत. तर पंजाब किंग्समध्ये भानुरा राजपक्षे, सॅम करण, नॅथन एलिस आणि सिंकदर रझा या चौघांचा समावेश आहे.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम करन, नॅथन एलिस, हरप्रीत ब्ररार, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह

कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज, मनदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, टीम साउथी, अनुकूल रॉय, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.