
आशिया कप स्पर्धेच्या साखळी फेरीतच भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचं सुपर 4 फेरीचं गणित जर तर वर येऊन ठेपलं आहे. इतकंच काय तर पाकिस्तानला भारताविरूद्धच्या सामन्यात अपमानही सहन करावा लागला. राष्ट्रगीत वाजलं तेव्हाही आणि भारतीय संघाने हँडशेक केला नाही तेव्हाही मान खाली घालावी लागली. त्यामुळे सोशल मीडियावर पाकिस्तान संघावर टीकेची झोड उठली आहे. असं असताना पीसीबीचे अध्य मोहसिन नकवी यांनी मोठा निर्णय घेत संघाच्या संचालकांना निलंबित केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक उस्मान वहाला यांना तात्काळ निलंबित केलं आहे. सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्याच्या वादग्रस्त घटना व्यवस्थितरित्या हाताळण्यात त्रुटी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तान संघाच्या खेळ भावनेला ठेच पोहोचली.
संचालक उस्मान वाहला मागच्या दोन वर्षांपासून या पदावर कार्यरत होते. तसेच पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचे चेअरमनङी आहेत. त्यांच्यावर हस्तांदोलन प्रकरण व्यवस्थितरित्या हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पीसीबीच्या अंतर्गत पुनरावलोकनात अहवालात स्पष्ट झाले की की वहाला यांनी सामन्यापूर्वीच्या तयारीत पाकिस्तानच्या हित जपण्यात हयगय केली. त्याचा फटका मैदानात खेळाडूंना बसला आणि मान खाली घालण्याची वेळ आली. सामना सुरु होण्यापूर्वीच त्यांनी हा मुद्दा निकाली काढायला हवा होता. तर सामना संपल्यानंतरही समारोप न करता मैदान सोडलं.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा या प्रकारामुळे चांगलाच संतापला होता. त्यामुळे त्याने सामन्यानंतर पार पडलेल्या सादरीकरणात भाग घेतला नाही. दुसरीकडे, मुख्य प्रशिक माइक हेसन यांनी भारतीय संघाच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे, पाकिस्तानने सामनाधिकारी अँडी पायक्रॉप्टवरही गंभीर आरोप केले आहेत. पीसीबीच्या दाव्यानुसार, दोन्ही कर्णधार नाणेफेकीवेळी हात मिळवणार नाही, अशी सूचना आधीच देण्यात आली होती. हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचं पीसीबीने म्हंटलं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीसीबीने केली आहे. आशिया क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी आयसीसीकडे त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.