AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध कृष्णा ठरतोय टीम इंडियासाठी महागडा गोलंदाज, तरी का मिळतंय संधी? जाणून घ्या कारणं

टीम इंडियाने रायपूर वनडे सामन्यात 358 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र सुमार गोलंदाजीमुळे भारताला हा सामना गमवावा लागला. यात प्रसिद्ध कृष्णाने सर्वात महागडा स्पेल टाकला आणि टीम इंडियाला पराभवाच्या दरीत ढकललं. असं असूनही त्याच्यावर इतका विश्वास का टाकला जात आहे?

प्रसिद्ध कृष्णा ठरतोय टीम इंडियासाठी महागडा गोलंदाज, तरी का मिळतंय संधी? जाणून घ्या कारणं
प्रसिद्ध कृष्णा ठरतोय टीम इंडियासाठी महागडा गोलंदाज, तरी का मिळतंय संधी? जाणून घ्या कारणंImage Credit source: टीव्ही 9 तेलुगूवरून
| Updated on: Dec 04, 2025 | 8:12 PM
Share

IND vs SA: प्रसिद्ध कृष्णा हा भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. विकेट घेणारा गोलंदाज की धावा देणारा गोलंदाज असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला आहे. ठरावीक सामने सोडले तर प्रसिद्ध कृष्णा प्रत्येक सामन्यात महागडा ठरला आहे. आतापर्यंतचे आकडे याबाबत स्पष्ट काय सांगत आहे. त्याच्या सुमार गोलंदाजीमुळे भारताला दुसरा वनडे सामना गमवण्याची वेळ आली. असं असूनही प्रसिद्ध कृष्णाला वारंवार संधी देण्याचं कारण काय? भारतात त्याच्या इतक्या क्षमतेचे दुसरे गोलंदाज नाहीत का? असे एक ना अनेक प्रश्न क्रीडारसिक विचारत आहेत. कसोटी, वनडे आणि टी20 फॉर्मेटमध्ये त्याचा इकोनॉमी रेट हा सुमार असूनही त्याला वारंवार संधी देण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात या मागची कारणं

प्रसिद्ध कृष्णाकडून अशा आहेत अपेक्षा

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने प्रसिद्ध कृष्णावर इन्व्हेस्टमेंट केली जात असल्याचं बोललं जात आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धा दक्षिण अफ्रिकेत खेळली जाणार आहे. या खेळपट्ट्यांवर खूपच उसळी असते. प्रसिद्ध कृष्णा हिट द डॅक बॉलर आहे. म्हणजेच खेळपट्टीवर बॉल जोरात आपटण्याची क्षमता आहे. अशा गोलंदाजाची दक्षिण अफ्रिकेत गरज आहे. त्यामुळे टीम इंडिया त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रसिद्ध कृष्णासारखे गोलंदाज भारताकडे नाहीत. भारतात स्विंग आणि सीम गोलंदाज भरपूर आहे. पण प्रसिद्ध कृष्णा हाईटमुळे पेस आणि अतिरिक्त उसळी घेण्यास माहीर आहे. यामुळे फलंदाजाला शॉट खेळण्यात अडचण येते आणि विकेट मिळू शकते.

भारतात अशा प्रकारची गोलंदाजी फार काही प्रभावी ठरत नाही. पण दक्षिण अफ्रिकेत त्याचा उपयोग होऊ शकतो. पण त्याच्या आधीच त्याचं मनोबल ढासळलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहे. विराट कोहली देखील प्रसिद्ध कृष्णाचा चाहता. कर्णधार असताना त्याने प्रसिद्ध कृष्णाचा उल्लेख भविष्य असा केला होता. पण दुखापतीमुळे त्याच्या करिअरला ब्रेक लागत गेला. सध्या त्याचा फॉर्मही नाही. त्यामुळे आता त्याला स्वत:ला सिद्ध करण्याशिवाय पर्याय नाही. तिसऱ्या वनडे सामन्यात त्याला संधी मिळेल की नाही हा देखील प्रश्न आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार