IND vs SA : तुझं डोकं लावू नको, कॅप्टन केएल प्रसिध कृष्णावर संतापला, पाहा व्हीडिओ
KL Rahul on Prasidh Krishna : भारतीय संघाला रायपूरमध्ये 358 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडियावर जोरदार टीका केली जात आहे. भारताच्या या पराभवात बॉलर प्रसिध कृष्णा याचंही योगदान असल्याचं म्हटलं जातंय. प्रसिधने या सामन्यात खोऱ्याने धावा दिल्या.

रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने शतक झळकावलं. तर अखेरच्या क्षणी कॅप्टन केएल राहुल याने अर्धशतक करत फिनिशिंग टच दिला. भारताने यासह 50 ओव्हरमध्ये 358 धावांपर्यंत मजल मारली. या विशाल धावसंख्येमुळे टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल आणि मालिका आपल्या नावावर करेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र भारतीय गोलंदाज 358 धावांचा यशस्वी बचाव करण्यात अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि करो या मरो सामन्यात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
सुमार फिल्डिंग आणि निराशाजनक बॉलिंग यामुळे भारताला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. मात्र भारताने फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये माती केली. भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला रोखण्यात अपयशी ठरले. अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांनी खोऱ्याने धावा लुटवल्या. प्रसिध कृष्णा याने 2 विकट्स घेतल्या. मात्र प्रसिधने भरपूर धावा दिल्या. प्रसिधची बॉलिंग पाहून कॅप्टन केएलची सटकली. त्यामुळे केएलने प्रसिधला तुझं डोकं लावू नको, अशा शब्दात सुनावलं. कहर म्हणजे प्रसिधने केएलला जुमानलं नाही. त्यामुळे केएला पारा चढला.
शांत केएल राहुल भडकला
View this post on Instagram
केएल शांत आणि संयमी स्वभावाचा आहे. मात्र प्रसिधची बॉलिंग पाहून त्याचा पारा चढला नसता तरच नवल. प्रसिध त्याच्या रणनितीनुसार बॉलिंग करत होता. मात्र त्यात त्याला काही यश आलं नाही. उलट दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज त्याची धुलाई करत होते. त्यामुळे केएलने प्रसिधला स्वत:चं डोकं न लावण्याचा सल्ला दिला. तसेच सांगतोय तेवढंच कर, असंही केएलने प्रसिधला म्हटलं. केएलने प्रसिधला कन्नडमध्ये या सूचना केला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. केएल आणि प्रसिधमधील संभाषण कन्नडमध्ये झाल्याने बहुतांश चाहत्यांना समजलं नाही.
केएल काय म्हणाला?
“प्रसिध तुझं डोक लावू नको. फक्त मी तुला सांगितलंय तिथेच बॉलिंग कर. डोक्याच्या दिशेने बॉलिंग करु नकोस”, असं केएल प्रसिधला म्हणाला. मात्र त्यानंतरही प्रसिधने बॅट्समनच्या डोक्याजवळ बॉल टाकला. त्यामुळे केएल संतापला. “मी तुला म्हटलं होतं. तरी तु पुन्हा डोक्याजवळ बॉलिंग करतोय”, असं म्हणत केएलने प्रसिधची कानउघडणी केली.
प्रसिधची धुलाई
दरम्यान प्रसिधने रायपूरमध्ये 10 पेक्षा अधिकच्या इकॉनमी रेटने धावा दिल्या. प्रसिधने 8.2 ओव्हरमध्ये 10.2 च्या इकॉनमीने 85 रन्स दिल्या. प्रसिधला केवळ 2 विकेट्सच घेता आल्या.
