Prasidh krishna IPL Auction 2022: वेस्ट इंडिज विरुद्ध जबरदस्त गोलंदाजीने झाला ‘प्रसिद्ध’, मिळाले 10 कोटी

Prasidh krishna IPL Auction 2022: वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन वनडे सामन्यांमध्ये प्रसिद्ध कृष्णाने जबरदस्त गोलंदाजी केली. तिन्ही सामन्यांमध्ये भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Prasidh krishna IPL Auction 2022: वेस्ट इंडिज विरुद्ध जबरदस्त गोलंदाजीने झाला 'प्रसिद्ध', मिळाले 10 कोटी
prasidh krishna instagram
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 6:08 PM

बंगळुरु: नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत दमदार गोलंदाजी करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला IPL Mega Auction मध्ये चांगला भाव मिळाला आहे. आयपीएल टी-20 लीग मध्ये खरंतर फलंदाजांचा बोलबाला जास्त असतो. लांब-लांब पर्यंत चौकार-षटकार खेचण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंवर मोठी बोली लागते. पण तुमच्याकडे उत्तम गोलंदाजीची क्षमता असेल, तर इथे तुम्हाला सुद्धा चांगला भाव मिळू शकतो. प्रसिद्ध कृष्णाच्या (Prasidh krishna) बाबतीत हेच दिसून आलं. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन वनडे सामन्यांमध्ये प्रसिद्ध कृष्णाने जबरदस्त गोलंदाजी केली. तिन्ही सामन्यांमध्ये भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं. त्यामुळे भारताला वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs west indies) मालिकेत क्लीन स्वीप विजय मिळवता आला. यामध्ये प्रसिद्ध कृष्णाचे महत्त्वाचे योगदान होते.

नऊ विकेट घेणाऱ्या कृष्णाला मालिकावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आलं. गोलंदाजाला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा त्याने अचूक फायदा उचलला व तीन सामन्यात नऊ विकेट घेतल्या. याच कृष्णाला विकत घेण्यासाठी आज IPL च्या तीन फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसून आली.

लखनऊ सुपज जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या तीन संघांनी कृष्णाला आपल्या चमूत घेण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. राजस्थानने 3.80 ची बोली लावली. त्यानंतर लखनऊने चार कोटींची बोली लावली. गुजरात टायटन्स 6.25 कोटी रुपये मोजायला तयार होता. पण अखेर राजस्थानने 10 कोटींना कृष्णाला विकत घेतलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.