AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : अरे मला विसरला का? रिंकू सिंहची पत्नी रागावली, प्रिया सरोज यांचा अवतार पाहून…व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय!

भारताचा स्टार खेळाडू रिंकू सिंह आणि त्याची पत्नी प्रिया सरोज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया सरोज रिंकूवर नाराज झाल्याचे दिसत आहे. व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Video : अरे मला विसरला का? रिंकू सिंहची पत्नी रागावली, प्रिया सरोज यांचा अवतार पाहून...व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय!
rinku singh and priya sarojImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 10, 2026 | 3:38 PM
Share

Rinku Rajguru And Priya Saroj Video : सोशल मीडियाचं जग फारच वेगळं आहे. इथे कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. नुकताच टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सामना चालू असताना तसेच सामना झाल्यानंतर लोकांनी या खेळाडूंचे अनेक खास क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. त्यांचे हेच व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा सदस्य असलेल्या रिंकू सिंह आणि त्याची पत्नी खासदार प्रिया सरोज यांचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू सिंह चक्क आपल्या पत्नीला विसरला आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

हा व्हिडीओ एका विमानतळावरील असल्याचे दिसत आहे. मात्र तो नेमका कुठला आहे, हे समजू शकले नाही. या व्हिडीओत रिंकू आणि प्रिया सरोज हे दोघेही दिसत आहेत. रिंकू सिंहच्या कानात हेडफोन आहेत. तर प्रिया सरोजच्या डोक्यावर काळ्या रंगाचा गॉगल दिसतोय. प्रिया सरोजच्या एका हातात मोबाईल फोन आहे. तर दुसऱ्या हातात पर्स आहे. रिंकू सिंहच्या खांद्यावर त्याची बॅग दिसत आहे. दोघेही कुठेतरी चालत जात आहेत. परंतु याच वेळी रिंकू सिंहने एक चूक केली आहे.

अरे मला विसरून गेला का?

रिंकू सिंह चालत असताना आपली पत्नी प्रिया सरोजला विसरून गेला आहे. तिला मागे सोडून रिंकू वेगात चालत आहे. हे सगळे पाहून प्रिया सरोज थोडी नाराज झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. ‘अरे मला विसरून गेला आहेस का?’ असे प्रिया सरोज त्याला विचारत असल्याचे दिसत आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर रिंकूने प्रिया सरोज यांच्या खांद्यावर हात टाकला आहे. त्यानंतर दोघेही सोबत चालत आहेत.

दरम्यान, एक्स या समाजमाध्यमावर @choudhary_99415 या खात्यावर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला आहे. नोटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. रिंकू आणि प्रिया सरोज यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार