PSL 2023 | 13 बॉलमध्ये 64 रन्स, फलंदाजाचा झंझावात, व्हीडिओ व्हायरल

या फलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची पिसं काढली. या फलंदाजाने मैदानात चौफेर फटकेबाजी करत 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकले. या खेळीचा व्हीडिओ व्हायरल झालाय.

PSL 2023 | 13 बॉलमध्ये 64 रन्स, फलंदाजाचा झंझावात, व्हीडिओ व्हायरल
| Updated on: Feb 15, 2023 | 11:21 PM

दुबई | पाकिस्तान सुपर लीग या क्रिकेट स्पर्धेत कराची किंग्स आणि पेशावर जाल्मी यांच्यातील सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळाला. पेशावर जाल्मीकडून खेळणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजाने तुफानी खेळई केली. या फलंदाजाने 13 बॉलमध्ये 64 धावा कुटल्या. इंग्लंडच्या या खेळाडूची बॅटिंग पाहून पाकिस्तानचा बाबर आझम हा आनंदी झाला.

कराची नॅशनल स्टेडियमवर पेशावर जाल्मीचा फलंदाज टॉम कोल्हेर याने कराची किंग्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. टॉमने मैदानात येताच फटकेबाजीला सुरुवात केली. टॉमच्या फटकेबाजीच्या जोरावर पेशावर जाल्मीने मोठी धावसंख्या उभारली. कराचीला विजयी लक्ष्य गाठता आलं नाही. टॉमने 92 धावांची खेळी केली.

टॉमची फटकेबाजी

6 सिक्स आणि 7 चौकार

पेशावर जाल्मीने 2 विकेट्स गमावले. मात्र चौथ्या क्रमांकावर टॉम आणि कॅप्टन बाबर आझम या दोघांनी कराची किंग्सच्या गोलंदाजांची पिसं काढली. त्याने 7 चौकार आणि 6 खणखणीत सिक्स ठोकले. म्हणजेच टॉमने अवघ्या 13 बॉलमध्ये 64 रन्स ठोकल्या. टॉमने एकूण 50 बॉलमध्ये 92 धावांची खेळी केली. मात्र टॉमला शतक पूर्ण करता आलं नाही. पण टॉमच्या या खेळीमुळे टीम चांगल्या स्थितीत पोहचली.

पीएसएलमध्ये टॉमची वादळी खेळी

बाबर-टॉमची शानदार खेळी

पेशावर जाल्मीने झटपट 2 विकेट्स गमावल्याने त्यांच्यावर दबाव आला. मात्र बाबर आणि टॉम या दोघांनी टीमचा डाव सावरला. बाबरने 68 धावांची खेळी केली. ज्यामुळे पेशावरने कराचीसमोर 199 धावांच लक्ष्य ठेवलं. कराचीनेही तोडफोड बॅटिंग केली. सामना रंगतदार झाला.मात्र कराचीला 197 धावाच करता आल्या.