AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: Virat Kohli कडून असं कसं घडू शकतं? अश्विनलाही विश्वास नाही बसला, VIDEO

IND vs SA: विराटकडून ती चूक झाली नसती, तर कदाचित आज निकाल वेगळा दिसला असता.

IND vs SA: Virat Kohli कडून असं कसं घडू शकतं? अश्विनलाही विश्वास नाही बसला, VIDEO
Virat kohli Image Credit source: File photo
| Updated on: Oct 30, 2022 | 8:38 PM
Share

पर्थ: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडियाचा पराभव झाला. यंदाच्या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पाच विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाने आज दक्षिण आफ्रिकेला सहजासहजी जिंकू दिलं नाही. टीम इंडिया आज लढून हरली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी सोपं लक्ष्य दिलं होतं.

….तर कदाचित टीम इंडिया जिंकली असती

पण पर्थच्या वेगवान विकेटवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केलं. दक्षिण आफ्रिकेच्या टीमला विजयासाठी शेवटच्या ओव्हरपर्यंत झुंजवलं. टीम इंडियाकडून आज फिल्डिंगमध्ये काही चूका झाल्या. या चूका झाल्या नसत्या, तर कदाचित टीम इंडिया जिंकली सुद्धा असती.

विराट कोहली उत्तम फिल्डिंर सुद्धा आहे

विराट कोहली हा क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू आहे. बॅटिंग बरोबर तो फिल्डिंगही उत्तम करतो. आज तो बॅटने विशेष कमाल दाखवू शकला नाही. दोन चौकार मारुन त्याने चांगली सुरुवात केली होती. पण 12 धावांवर तो बाद झाला. विराट कोहली उत्तम फिल्डिंर सुद्धा आहे.

विकेट त्यावेळी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा होता

धावा वाचवण्याबरोबरच कॅच त्याच्या हातातून सहसा सुटत नाहीत. पण आज पर्थच्या मैदानात असं घडलं. विराट कोहलीच्या हातातून एक सोपा झेल सुटला. 12 व्या ओव्हरमध्ये अश्विन गोलंदाजी करत असताना विराटच्या हातून ही कॅच सुटली. खरंतर एडन मार्करामचा विकेट त्यावेळी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा होता.

विराटकडून अशी चूक कशी झाली?

टीम इंडियाने 24 धावात दक्षिण आफ्रिकेचे तीन विकेट काढून त्यांना बॅकफूटवर ढकललं होतं. मार्कराम आणि मिलरने डाव सावरुन त्यांची सुटका केली. दोघांनी हाफ सेंच्युरी झळकवली. मार्करामने 52 रन्स आणि मिलरने नाबाद 59 धावा केल्या. मार्करामच्या विकेटची गरज असताना विराटच्या हातातून झेल सुटला. विराटकडून कॅच कशी सुटू शकते? असा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. कारण विराट कोहली सर्वोत्तम फिल्डर आहे. विराटच्या हातातून मार्करामचा लॉलीपॉप कॅच सुटल्याच पाहून अश्विनलाही विश्वास बसला नाही. टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 134 धावांच लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 2 चेंडू बाकी असताना पूर्ण केलं.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.