
India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असेल. हा सामना 14 जानेवारीला दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तसं पाहीलं तर हा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आहे. पण भारतीय खेळाडूंमध्ये एक द्वंद्व पाहायला मिळेल. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे दोन दिग्गज खेळाडू भिडणार आहेत. हे द्वंद्व एकमेकांना मागे टाकण्यासाठी असणार आहे. श्रेयस अय्यर आणि विराट कोहली वनडेतील दिग्गज खेळाडू आहेत. मागच्या 20 वनडे सामन्यातील आकडेवारी पाहिली तर या दोघांचं द्वंद्व पाहायला मिळेल. मागच्या 20 वनडे सामन्यात श्रेयस अय्यर विराट कोहलीपेक्षा वरचढ ठरला आहे. श्रेयसने विराटपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण सध्या विराट कोहलीचा फॉर्म पाहता पुढच्या सामन्यात काहीही होऊ शकते.
श्रेयस अय्यरने मागच्या 20 सामन्यात 1030 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीही या शर्यतीत फार मागे नाही. सध्या विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने मागच्या 20 डावात 1024 धावा केल्या आहेत. म्हणजेच या दोघांमध्ये फक्त 6 धावांचं अंतर आहे. दुसरीकडे रोहित शर्माही या शर्यतीत कधीही येऊ शकतो. कारण 927 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता राजकोटमध्ये कोण पुढे जातं याची उत्सुकता आहे. खरं तर ही शर्यत विराट आणि श्रेयस दरम्यान आहे. आता राजकोटमधील याचा फैसला होणार आहे.
दुसरीकडे, श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी आहे. त्याने राजकोट वनडे सामन्यात 34 धावा केल्या, तर विराट-शिखरला मागे टाकेल. 34 धावा करताच विराट कोहली वनडेत सर्वात वेगाने 3000 धावा करणार फलंदाज ठरेल. शिखर धवनने 72 डावात 3 हजार धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने 75 डावात हा पल्ला गाठला होता. श्रेयस अय्यरने 69 डावात येथपर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे श्रेयस अय्यर मधल्या फळीत फलंदाजीला उतरतो. असं असूनही वेगाने 3 हजार धावांच्या टप्प्याजवळ पोहोचला आहे.