Virat Kohli : विराट कोहली फलंदाजीला उतरण्याआधी हा टोटका वापरतो? पाहा Video
IND vs NZ : विराट कोहलीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक सवयींकडे चाहत्यांचं लक्ष लागून असतं. त्याच्या आवडीनिवडींचं बारकाईनं निरीक्षण केलं जातं. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चला जाणून नेमकं काय आहे ते..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदरामध्ये पार पडला. हा सामना भारताने जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा फॉर्मात असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे. त्याने या सामन्यात 93 धावांची खेळी केली. पण त्याचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला विजयाची चव चाखता. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. आता दुसरा वनडे सामना 14 जानेवारी रोजी राजकोट येथे खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयाचं टीम इंडियाचं स्वप्न असणार आहे. असं असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात बॅटिगला जाण्यापूर्वी त्याची कशी तयारी हे दिसून येत आहे. चला जाणून घेऊयात फलंदाजीला जाण्यापूर्वी काय करतो.
व्हायरल व्हिडीओनुसार, विराट कोहली पहिल्या वनडे सामन्यादरम्यान फलंदाजीला बाहेर पडण्यापूर्वी काय तयारी करतो हे दिसत आहे. विराट कोहली वडोदरात पॅव्हेलियनमद्ये बसून डावासाठी स्वत:ला तयार करून घेत आहे. त्यात त्याचा काही सवयींची नोंद झाली आहे. विराट कोहली फलंदाजीला जाण्यापूर्वी त्याच्या शरीरावर परफ्यूम स्प्रे करतो. त्यानंतर दोन्ही हातांना क्रिम लावतो. त्यानंतर पटकन काहीतरी खातो. ते सर्व झाल्यानंतर मैदानात उतरतो. आता ही त्याची नेहमीची सवय आहे की नाही ते सांगता येत नाही. कारण हा व्हिडीओ फक्त एका सामन्यापूर्वीचा आहे. जर इतर सामन्यातही तो असंच करत असेल तर ती त्याची रोजची सवय असू शकते, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत.
Virat Kohli’s routine before coming out to bat and his grand entry.🔥
King Kohli aura 🐐 pic.twitter.com/VLGbmHqUHU
— Sonu (@Cricket_live247) January 12, 2026
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 28 हजार धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहली क्रिकेटच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्याने टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे वनडे मालिकेतच खेळत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी जोरदार तयारी सुरू आहे. विराट कोहलीचा हा फॉर्म कायम राहिला तर त्याचं वनडे संघातील स्थान वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत कायम राहील.
