रोहित आणि विराटमध्ये रस्सीखेच! कोहलीने मारली बाजी? झालं असं की..
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघंही आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त वनडे सामन्यात सामन्यात खेळतात. असं असताना या दोघांमध्ये आता स्पर्धा रंगली आहे. वडोदरामध्ये न्यूझीलंडविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यानंतर ही स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. काय ते जाणून घ्या.

रनमशिन विराट कोहलीला सूर गवसल्याने प्रतिस्पर्धी संघांना घाम फुटला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विराट कोहलीला खातंही खोलता आलं नव्हतं. पण तिसऱ्या वनडे सामन्यानंतर विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीने गियर बदलला. त्यामुळे त्याच्या करिअरला धावांची गती मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यापासून विराट कोहलीची गाडी टॉप गियरमध्ये आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना घाम फुटला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातही विराट कोहलीने 93 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे आयसीसी वनडे मालिकेत त्याचं पहिलं स्थान पक्कं मानलं जात आहे. वनडे क्रिकेटमधील फलंदाजांच्या यादीत त्याचं पहिलं स्थान पक्क मानलं जात आहे. आयसीसीची वनडे रँकिंग बुधवारी जाहीर होईल. पण तत्पूर्वीच नंबर एकचा अंदाज बांधला जात आहे. ताज्या वनडे रँकिंगमध्ये रोहित शर्मा पहिल्या आणि विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.
आयसीसी क्रमवारीत रोहित शर्माचे रेटिंग प्वाइंट 781 आहेत. तर विराट कोहलीचे रेटिंग प्वॉइंट हे 773 इतके आहेत. या दोघांमध्ये फक्त 8 अंकांचा फरक आहे. पण विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 50 हून अधिक धावा केल्या. त्याचं शतक फक्त 7 धावांनी हुकलं. पण यामुळे त्याच्या रेटिंग प्वाइंटमध्ये वाढ होणार यात काही शंका नाही. विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळण्यासाठी उतरेल तेव्हा जगातील नंबर 1 वनडे फलंदाज असेल. विराट कोहली जवळपास 5 वर्षांनी वनडे रॅकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावणार आहे. विराट कोहली 2021मध्ये नंबर 1 स्थानी विराजमान होता. त्यानंतर त्याची जागा बाबर आझमने घेतली.
विराट कोहली 2022 मध्ये टॉप 10 मधून आऊट झाला. पण 2023 पासून त्याने कमबॅक करण्यास सुरुवात केली. 2025च्या शेवटी विराट कोहली वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला. आता पहिल्या स्थानावर विराजमान होणार हे नक्की आहे. विराट कोहलीने 7 लिस्ट ए सामन्यात 50हून अधिक धावा केल्या आहेत. यात 3 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीचा धावांचं गणित असंच सुरू राहिलं तर त्याला वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावरून दूर करणं शक्य होणार नाही. जर राजकोटमध्येही विराट कोहलीने अर्धशतक ठोकलं तर पाचपेक्षा जास्तवेळा 50हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. कारण यापूर्वी इतक्या सलग 50हून अधिक धावा केलेल्या नाहीत.
