
इंग्लंड दौऱ्यात आपल्या तळपत्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजाला वैभव सूर्यवंशीने पाणी पाजले. 14 वर्षीय वैभव आता ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी संघ कांगारू संघासोबत 3 एकदिवसीय सामने आणि दोन 4 दिवसीय कसोटी सामने खेळणार आहे. 21 सप्टेंबर रोजी दोन्ही संघ भिडतील. या दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशी जमके सराव करत आहेत. या सरावाचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात वैभवच्या एका शॉटवर 4 लोक आपलं डोकं वाचवण्यासाठी खाली झोपताना दिसतात.
चार लोक थोडक्यात बचावले
आयुष्य म्हात्रे याच्या नेतृत्वात भारताचा 19 वर्षांखालील संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहे. 21 सप्टेंबर रोजी दोन्ही देशात सामने सुरू होतील. त्यासाठी वैभव सूर्यवंशी हा जोरदार सराव करत आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर केला आहे. त्यात तो एकदम फटकेबाजी करताना दिसतो. त्याने इतका जोरात फटका मारला की, तिथे उपस्थित चार लोक थेट जमिनीवर झोपले. वैभव सूर्यवंशीने एका प्रमोशनल शूट दरम्यान हा शॉट खेळला. त्यावेळी चेंडूचा मार बसू नये म्हणून कॅमेरामन आणि शूटिंग क्रूमधील अनेक सदस्य थेट जमिनीवर लोळले.
काय आहे त्या व्हिडिओत?
वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्ससाठी एक प्रमोशनल शूट करायचे होते. त्यासाठी तो फटकेबाजी करत होता. त्याच्या हेल्मेटवर एक गोप्रो कॅमेरा लावण्यात आला होता. नॉन-स्ट्रायकर एंडवर उपस्थित असलेले क्रू मेंबर्स विविध अँगलमधून त्याची फलंदाजी रेकॉर्ड करत होते. एका गोलंदाजाने वैभव सूर्यवंशीला चेंडू टाकताच मग त्याने तो जोरदारपणे फटकावले. त्याने इतक्या वेगात चेंडू फटकावला की तो एखाद्या बंदुकीतील गोळीप्रमाणे आला. त्यामुळे क्रू मेंबर्सची भांबेरी उडाली. आता डोकं तरी शाबूत राहावं म्हणून ते सरळ जमिनीवर झोपले.
Should we post the full video? 👀🔥 pic.twitter.com/DxIqnYu0tY
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 6, 2025
या व्हिडिओत आपली चूक लक्षात येताच मग वैभवने निरागस चेहरा केला आणि सॉरी..सॉरी म्हणत सर्वांची माफी मागितली. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे. सध्या वैभव सूर्यवंशी जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याच्याकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कमाल कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.