VIDEO : इंग्लंडच्या T20 Blast मध्ये दिसली धोनीची झलक, ‘या’ खेळाडूने उडवला ‘सेम टू सेम’ हेलिकॉप्टर शॉट

| Updated on: Aug 25, 2021 | 12:45 PM

एम एस धोनीची तुफान फलंदाजी सर्वांनाच वेड लावणारी आहे. पण त्याच्या या तुफान फलंदाजीतील तुफान शॉट म्हटलं तर 'हेलिकॉप्टर शॉट'. या शॉटने धोनीची ओळख असली तरी आणखी एक स्टार खेळाडू असाच शॉट मारत असल्याचे अलीकडे दिसून आले आहे.

VIDEO : इंग्लंडच्या T20 Blast मध्ये दिसली धोनीची झलक, या खेळाडूने उडवला सेम टू सेम हेलिकॉप्टर शॉट
राशिद खान
Follow us on

लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धडाकेबाज क्रिकेटर म्हटलं तर एम एस धोनीच्या (MS Dhoni) पिटाऱ्यातील दमदार शॉट म्हटलं तर ‘हेलिकॉप्टर शॉट’. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची जादू अजूनही उतरलेली नाही. त्याच्या हेलिकॉप्टर शॉटची जादूही आज देखील चाहत्यांमध्ये तितकीच आहे. याच जादूई शॉटची झलक इंग्लंडच्या T20 ब्लास्टमध्ये दिसून आली. पण हा शॉट धोनीने नाही तर, अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने (Rashid Khan) खेचला आहे.

अगदी धोनीसारखाच हेलिकॉप्टर शॉट राशिदने खेचत त्याच्या संघाला विजय मिळवून दिला. राशिद सध्या T20 ब्लास्टमधील सस्सेक्स (Sussex) संघाकडून खेळत आहे. त्याने यॉर्कशायर (Yorkshire) संघाविरुद्ध खेळताना 9 चेंडूत 27 धावा करत नाबात राहत संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. (Semi-finals of the T20 Blast). यॉर्कशायरच्या 178 धावांचे टार्गेट पार करताना राशिदने अप्रतिम असा हेलिकॉप्टर शॉट मारला. या शॉटचा व्हिडीओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

राशिद खान आयपीएलमध्ये खेळणार का?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या सैन्याने सक्रीय होत, अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे (Afghanistan and taliban crisis). राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. यामुळे संपूर्ण देश संकटात सापडला आहे. यामुळे अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) जो आयपीएलमध्ये (IPL 2021) सनरायजर्स हैद्राबाद संघाचे (SRH) महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यांच्या IPL खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.पण हैद्राबाद संघाचे सीईओ के.शानमुगम यांनी एएनआयशी बोलताना माहिती दिली की, ”राशिद युएईमध्ये सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार आहे. आताच्या ताज्या घडामोडींनंतर त्याच्याशी आमचं खेळाडूंशी बोलणं झालेलं नाही, पण हैद्राबाद संघाकडून तो नक्कीच खेळेल.” पुढे बोलताना हैद्राबादचे खेळाडू 31 ऑगस्टपर्यंत युएईसाठी रवाना होतील असंही के.शानमुगम यांनी सांगितलं.

हे ही वाचा

IPL 2021 पूर्वीच धोनीने उडवले उंच षटकार, मग स्वत:च गेला झाडात चेंडू शोधायला, पाहा मजेशीर VIDEO

PHOTO : IPL 2021 मध्ये 5 धाकड खेळाडूंची एन्ट्री, मनोरंजनात्मक गोलंदाजीसह फलंदाजीची रसिकांना पर्वणी

आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला ‘हे’ धुरंदर खेळाडू मुकणार, प्रत्येकाची कारणं वेगळी

(Rashid Khan hits Helicopter Shot like Ms Dhoni in T20 Blast)