AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL मध्ये Rohit Sharma च्या परफॉर्मन्सवर रवी शास्त्री खुश नाहीत, ‘हा’ सल्ला दिला

Rohit Sharma : IPL मध्ये Rohit Sharma च्या परफॉर्मन्सवर रवी शास्त्री खुश नाहीत. त्यांनी रोहित शर्माला आपला फॉर्म सुधारण्याचा सल्ला दिला आहे. मागच्या आयपीएल सामन्यात मुंबईला चेन्नईने हरवलं होतं.

IPL मध्ये Rohit Sharma च्या परफॉर्मन्सवर रवी शास्त्री खुश नाहीत, 'हा' सल्ला दिला
| Updated on: May 10, 2023 | 10:12 AM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचा हा सीजन सोपा नाहीय. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आयपीएलमध्ये रोहित शर्माच प्रदर्शन खास नाहीय. मुंबईला टॉप 4 मध्ये पोहोचायच असेल, तर तुफानी इनिंग खेळावी लागेल. मागच्या आयपीएल सामन्यात मुंबईला चेन्नईने हरवलं होतं.

टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री रोहित शर्माच्या परफॉर्मन्सवर खुश नाहीयत. त्यांनी रोहितच्या नेतृत्वावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहितच्या व्यक्तीगत कामगिरीचा त्याच्या कॅप्टनशिपवर परिणाम होतोय, असं शास्त्री यांचं मत आहे.

‘तुम्ही कोण आहात, याने फरक पडत नाही’

“एक कॅप्टन म्हणून तुमची कामगिरी दिसली पाहिजे. तुम्ही पर्पल पॅचवर असाल, तुम्ही धावा बनवत असाल, तर कॅप्टन म्हणून तुमच काम अधिक सोपं होतं. मैदानात बॉडी लँगवेज बदलेली असते. मैदानावर एक वेगळी एनर्जी असते. तेच ज्यावेळी धावा होत नाहीत, त्यावेळी परिस्थिती अनुकूल नसते. तुम्ही कोण आहात, याने फरक पडत नाही”असं रवी शास्त्री म्हणाले. ‘ही कॅप्टनची जबाबदारी आहे’

“दोन-तीन वर्षांपूर्वी तुमच्याकडे जे स्त्रोत होते, तीच स्थिती कायम नसते. त्यावेळी पुढे तुम्ही कसं जाणार? हे आव्हान निर्माण होतं. तुम्ही टीमला कसं प्रोत्साहित करणार? तुम्ही टीम कॉम्बिनेशन कसं बनवणार? त्यावेळी कॅप्टन म्हणून तुमच्यासमोरच आव्हान दुप्पट होतं” असं रवी शास्त्री म्हणाले. “टीम म्हणून सर्वांना बांधून ठेवणं, एकत्र आणणं, एक चांगला संघ उभारण ही कॅप्टनची जबाबदारी आहे, असं रवी शास्त्री म्हणाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.