IPL मध्ये Rohit Sharma च्या परफॉर्मन्सवर रवी शास्त्री खुश नाहीत, ‘हा’ सल्ला दिला

| Updated on: May 10, 2023 | 10:12 AM

Rohit Sharma : IPL मध्ये Rohit Sharma च्या परफॉर्मन्सवर रवी शास्त्री खुश नाहीत. त्यांनी रोहित शर्माला आपला फॉर्म सुधारण्याचा सल्ला दिला आहे. मागच्या आयपीएल सामन्यात मुंबईला चेन्नईने हरवलं होतं.

IPL मध्ये Rohit Sharma च्या परफॉर्मन्सवर रवी शास्त्री खुश नाहीत, हा सल्ला दिला
Follow us on

मुंबई : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचा हा सीजन सोपा नाहीय. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आयपीएलमध्ये रोहित शर्माच प्रदर्शन खास नाहीय. मुंबईला टॉप 4 मध्ये पोहोचायच असेल, तर तुफानी इनिंग खेळावी लागेल. मागच्या आयपीएल सामन्यात मुंबईला चेन्नईने हरवलं होतं.

टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री रोहित शर्माच्या परफॉर्मन्सवर खुश नाहीयत. त्यांनी रोहितच्या नेतृत्वावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहितच्या व्यक्तीगत कामगिरीचा त्याच्या कॅप्टनशिपवर परिणाम होतोय, असं शास्त्री यांचं मत आहे.

‘तुम्ही कोण आहात, याने फरक पडत नाही’

“एक कॅप्टन म्हणून तुमची कामगिरी दिसली पाहिजे. तुम्ही पर्पल पॅचवर असाल, तुम्ही धावा बनवत असाल, तर कॅप्टन म्हणून तुमच काम अधिक सोपं होतं. मैदानात बॉडी लँगवेज बदलेली असते. मैदानावर एक वेगळी एनर्जी असते. तेच ज्यावेळी धावा होत नाहीत, त्यावेळी परिस्थिती अनुकूल नसते. तुम्ही कोण आहात, याने फरक पडत नाही”असं रवी शास्त्री म्हणाले.

‘ही कॅप्टनची जबाबदारी आहे’

“दोन-तीन वर्षांपूर्वी तुमच्याकडे जे स्त्रोत होते, तीच स्थिती कायम नसते. त्यावेळी पुढे तुम्ही कसं जाणार? हे आव्हान निर्माण होतं. तुम्ही टीमला कसं प्रोत्साहित करणार? तुम्ही टीम कॉम्बिनेशन कसं बनवणार? त्यावेळी कॅप्टन म्हणून तुमच्यासमोरच आव्हान दुप्पट होतं” असं रवी शास्त्री म्हणाले. “टीम म्हणून सर्वांना बांधून ठेवणं, एकत्र आणणं, एक चांगला संघ उभारण ही कॅप्टनची जबाबदारी आहे, असं रवी शास्त्री म्हणाले.