रवींद्र जडेजाची निवृत्ती? अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध स्पेल संपताच…

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पहिला डाव संपताच रवींद्र जडेजाच्या निवृत्तीची चर्चा होत आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धचा पहिला डाव संपताच विराट कोहलीने त्याची गळाभेट घेतली. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

रवींद्र जडेजाची निवृत्ती? अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध स्पेल संपताच...
रवींद्र जडेजा
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 09, 2025 | 8:07 PM

रवींद्र जडेजा हे भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू.. त्याने आपल्या फिरकी आणि फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकवले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही रवींद्र जडेजाने 10 षटकात 30 धावा देत 1 गडी बाद केला. पण न्यूझीलंडविरुद्धचा पहिला डाव संपल्यानंतर विराटच कोहलीने त्याची गळाभेट घेतली. यामुळे जडेजा सामना संपताच निवृत्ती घेईल असं सांगण्यात येत आहे. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण त्याने 10 षटकं पूर्ण करताच विराट कोहलीची गळाभेट घेतल्याने ही चर्चा गरम झाली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी सोशल मीडियावर अंदाज बांधत आहेत की हा रवींद्र जडेजाच्या कारकिर्दीचा शेवटचा सामना असेल. पण या चर्चेत किती तथ्य आहे हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल. रवींद्र जडेजा निवृत्ती घेणार की नाही याबाबत अजूनही काही स्पष्ट नाही. काही चाहत्यांनी तर रवींद्र जडेजाला अधिकृत निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी धन्यवाद अशा पोस्ट केल्या आहे.

रवींद्र जडेजाने अंतिम सामन्यातही संघाला आवश्यक असलेली खेळी केली. जडेजाने किवी फलंदाजांना टीम इंडियावर भारी पडू दिलं नाही. इतकंच काय तर टॉम लॅथमची महत्त्वाची विकेट घेतली. 40 षटकं रोहित शर्माने त्याच्याकडे सोपवलं होतं. या षटकाचा शेवटचं चेंडू टाकताच विराट कोहली त्याच्याकडे गेला आणि दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

दरम्यान, टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील विजयानंतर रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता या सामन्यातील निकालानंतर रवींद्र जडेजाच्या वक्तव्याकडे नजरा लागून आहेत. आतापर्यंत ज्या चर्चा रंगल्या आहेत त्यात काही तथ्य आहे की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.