
भारताने इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. एक सामना गमावला, तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वाचं कौतुक होत आहे. असं असताना दुसऱ्याही चर्चा रंगल्या आहेत. युवराज सिंगच्या एका कार्यक्रमात शुबमन गिलसह संपूर्ण टीम इंडियाने भाग घेतला होता. याच कार्यक्रमात सचिन तेंडुलकर याच्यासह पत्नी अंजली आणि मुलगी साराही उपस्थित होती. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा नको त्या चर्चांना उधाण आलं आहे. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरं तर त्या व्हिडीओतून तसं काही स्पष्ट होत नाही. त्यामुळे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचं टीव्ही 9 पुष्टी करत नाही. मात्र सोशल मीडियावर नेटकरी भलताच अर्थ काढत आहेत. कारण व्हायरल व्हिडीओत रवींद्र जडेजा शुबमन गिलला चिडवताना दिसत आहे. तसेच जवळच सारा तेंडुलकरची आई बसली होती.
व्हायरल व्हिडीओनुसार शुबमन गिल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा एकत्र एकाच टेबलवर बसले होते. तेव्हा टाळ्यांचा कडकडात होतो आणि व्हायरल व्हिडीओ दिसत तसं फोकस अंजली तेंडुलकर यांच्यावर होतो. त्यानंतर रवींद्र जडेजा शुबमन गिलला चिडवतात दिसत आहे. जडेजा जसा शुबमन गिलची खोड काढतो तसा केएल राहुलही हसायला लागतो. दुसरीकडे, ऋषभ पंतही हसतच रवींद्र जडेजाच्या पाठीवर हात मारतो. पण रवींद्र जडेजा आणि इतर सहकारी का हसत होते हे मात्र स्पष्ट नाही. पण नेटकरी त्यांच्या पद्धतीने काय अर्थ लावायचा तो लावत आहेत.
Jaddu 🤣 pic.twitter.com/ua6fSI8bIA
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) July 11, 2025
युवराज सिंगच्या युवीकॅन फाउंडेशनमधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात शुबमन गिल एन्ट्री मारत आणि सारा त्याच्याकडे पाहात असते. मात्र कसोटी कर्णधार शुबमन गिल दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो. तर दुसऱ्या एका व्हिडीओत सारा तेंडुलकर शुबमन गिलसह संपूर्ण भारतीय संघाचा व्हिडीओ बनवताना दिसत आहे. असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे या केवळ सोशल मीडियावरील चर्चा असल्याचं दिसत आहे. कारण याबाबत अधिकृत असं काहीच समोर आलेलं नाही. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे.