Biparjoy : बायको असावी तर अशी, मैदानात दाखवली संस्कृती, पुन्हा एकदा जड्डूच्या पत्नीने जिंकली सर्वांची मनं!

रिवाबा जडेजा आता आयपीएलच्या फायनल सामन्यानंतर चर्चेत आली होती. गुजरातमधील उत्तर जामनगर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार रिवाबा जडेजा यांनी या वादळामुळे बेघर झालेल्या लोकांना मदत केली आहे

Biparjoy : बायको असावी तर अशी, मैदानात दाखवली संस्कृती, पुन्हा एकदा जड्डूच्या पत्नीने जिंकली सर्वांची मनं!
| Updated on: Jun 13, 2023 | 9:27 PM

मुंबई : अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय या चक्रीवादळाने भारतात कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. गुजरातमध्ये हवामान पूर्णपणे बदलले आहे. सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळाच्या तडाख्यामध्ये बेघर झालेल्या लोकांना जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा मदतीसाठी पुढे सरसावली आहे.

गुजरातमधील उत्तर जामनगर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार रिवाबा जडेजा यांनी या वादळामुळे बेघर झालेल्या लोकांना मदत केली आहे. जामनगरमधील 20,000 हून अधिक लोकांना या वादळाचा फटका बसला आहे. रिवाबा जडेजा लोकांना मदत करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेल्या सेवेच्या संस्कृतीनुसार मी आणि माझी टीम रात्रंदिवस काम करत आहोत. आम्ही 10,000 पेक्षा जास्त फूड पॅकेट्स तयार केले आहेत. जेणेकरून चक्रीवादळाच्या काळात सखल भागातील कोणालाही अन्न किंवा पाण्याशिवाय रहावं लागणार नाही, असं रिवाबा जडेजा यांनी म्हटलं आहे. रिवाबा जडेजा यांनी आपल्या सोशल मीडियावर फोटा शेअर केले आहेत.

 

दरम्यान, रिवाबा जडेजा आता आयपीएलच्या फायनल सामन्यानंतर चर्चेत आल्या होत्या. जडेजाने शेवटच्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत सीएसकेला पाचव्यांदा ट्रॉफी जिंकून दिली होती. या विजयानंतर मैदानात आल्यावर रिवाबा यांनी रवींद्र जडेजाच्या पायाला स्पर्श केला होता. त्यांचा हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.