IPL 2024 : 6 मॅचमध्ये फक्त 4 विकेट, वाईट पद्धतीने धुतलं, तरीही हा प्लेयर टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार का?

| Updated on: Apr 17, 2024 | 8:03 AM

IPL 2024 : टीम इंडियाचा एक प्रमुख गोलंदाज सध्या आयपीएलमध्ये खराब कामगिरी करतोय. 6 सामन्यात त्याने 57 च्या सरासरीने केवळ 4 विकेट घेतल्या आहेत. IPL संपल्यानंतर लगेच T20 वर्ल्ड कप होणार आहे. टीमच्या सिलेक्शनसाठी बैठका सुरु झाल्या आहेत. अशावेळी खराब फॉर्ममुळे त्याचं T20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये सिलेक्शन होईल का?

IPL 2024 : 6 मॅचमध्ये फक्त 4 विकेट, वाईट पद्धतीने धुतलं, तरीही हा प्लेयर टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार का?
Team India
Follow us on

सध्या IPL 2024 चा सीजन सुरु आहे. टीम इंडियातील खेळाडू वेगवेगळ्या फ्रेंचायजीकडून खेळत आहेत. काही प्लेयर्सचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. काही खेळाडूंचा संघर्ष सुरु आहे. आयपीएलचा सीजन संपल्यानंतर T20 वर्ल्ड कप आहे. यंदाचा वर्ल्ड कप अमेरिकेत होणार आहे. IPL 2024 च्या प्रदर्शनाकडे वर्ल्ड कपचा गेट पास म्हणून पाहिलं जात आहे. आयपीएलमध्ये खेळाडू कशी कामगिरी करतायत, त्याकडे बीसीसीआयच्या निवड समितीच लक्ष आहे. वर्ल्ड कपसाठी टीम निवडीच्यावेळी आयपीएलमधील कामगिरी सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. टीमच्या निवडीबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. टीम इंडियाचा एक मुख्य गोलंदाज आयपीएल 2024 मध्ये खराब फॉर्मचा सामना करतोय. IPL 2024 मध्ये मोहम्मद सिराजच प्रदर्शन खूपच साधारण राहिलय. सिराजचा हा फॉर्म त्याच्या सिलेक्शनमध्ये कुठे अडथळ ठरु नये.

मोहम्मद सिराज या आयपीएलमध्ये आतापर्यंत 6 सामने खेळलाय. त्याने 57 च्या खराब सरासरीने फक्त 4 विकेट घेतले आहेत. या दरम्यान प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. त्याची इकॉनमी सुद्धा 10 पेक्षा जास्त आहे. सिराजच असच प्रदर्शन सुरु राहिलं, तर त्याचं वर्ल्ड कपच्या टीममध्ये सिलेक्शन होईल का?. कॅप्टन रोहित शर्मा दुसऱ्या गोलंदाजाचा शोध घेईल का?. वेळ आल्यावर या प्रश्नाच उत्तर मिळेल.

टीम इंडियाकडे दुसरा पर्याय नाही का?

भारताचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागच्या मते मोहम्मद सिराजच टीममधील स्थान पक्क आहे. कारण सिराज एक मोठा खेळाडू आहे. आशिया कप आणि वर्ल्ड कप सारख्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. भारतीय टीममध्ये तो जसप्रीत बुमराह सारख्या वर्ल्ड क्लास बॉलरसोबत गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याच्यावर तितका दबाव नसतो. दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडे सिराजच्या तोडीचा दुसरा पर्याय सुद्धा उपलब्ध नाहीय.

टीम इंडिया किती वेगवान गोलंदाज सिलेक्ट करेल?

मोहम्मद सिराजचा भले सध्या फॉर्मसाठी संघर्ष सुरु असेल, पण वीरेद्र सेहवाग जे बोलतोय, त्यात तथ्य आहे. वर्ल्ड कपच्या शर्यतीत असलेल्या दुसऱ्या गोलंदाजांकडे पाहून असं वाटत नाही की, सिराजचा पत्ता कट होईल. T20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. भारतीय टीममध्ये 3 पेक्षा जास्त वेगवान गोलंदाज नसतील. तिथे स्पिनर्सना मदत मिळेल. हार्दिक पांड्याच्या रुपाने चौथा पर्याय उपलब्ध आहे.

आता टीममध्ये उरते फक्त एक जागा

भारताचा घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच टीममध्ये स्थान पक्क आहे. अर्शदीप सिंहच प्रदर्शन पाहून त्याचं सुद्धा टीममध्ये स्थान जवळपास निश्चित आहे. आता टीममध्ये उरते फक्त एक जागा, त्यासाठी तीन गोलंदाज आहेत, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार. या तिघांमध्ये मोहम्मद सिराजच सरस आहे.