RCB Vs GT, IPL 2026 Final Score and Highlights Updates : आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकवत नोंदवला विक्रम, गुजरातला होमग्राउंडवर नमवलं
RCB Vs GT IPL 2026 Final Highlights and Updates in Marathi : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील महाअंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आरसीबीने यजमान गुजरात टायटन्सला त्यांच्याच घरात पराभूत केलं. त्यामुळे गुजरातचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं.

पहिल्या ट्रॉफीसाठी तब्बल 18 वर्षांची प्रतिक्षा करावी लागल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कमाल करुन दाखवली आहे. आरसीबीने 19 व्या मोसमात 31 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. गुजरातने यासह सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली. आरसीबीने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर आपली छाप सोडली आणि गुजरातपेक्षा भारी कामगिरी केली. आरसीबी यासह चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सनंतर ट्रॉफी कायम राखणारी तिसरी टीम ठरली.
LIVE Cricket Score & Updates
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाला?
राजस्थान रॉयल्सचा युवा आणि सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी हा ऑरेेंज कॅपचा मानकरी ठरला. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा अंतिम सामन्यात भुवनेश्वर कुमार याला पछाडत पर्पल कॅप विजेता ठरला. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅपने सन्मानित करण्यात येतं. तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : विराट कोहली मॅन ऑफ द मॅच
आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरलेला विराट कोहली याचा सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. विराट कोहली याने या सामन्यात आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या. विराटने 42 बॉलमध्ये नॉट आऊट 75 रन्स केल्या. विराटने या खेळीत 3 सिक्स आणि 9 फोर लगावले.
-
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकवत नोंदवला विक्रम, गुजरातला होमग्राउंडवर नमवलं
आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाव कोरलं. सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. गुजरात टायटन्सने विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच गडी गमवून पूर्ण केलं. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स सलग जेतेपद जिंकणारा तिसरा संघ ठरला आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : विजयाच्या वेशीवर असताना आरसीबीला पाचवा धक्का, टिम डेविड बाद
आरसीबीला टिम डेविडच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. टिम डेविडने 17 चेंडूत 23 धावांची खेळी केली आणि बाद झाला. पण हा सामना गुजरात टायन्सच्या हातून कधीच निसटला आहे. दुसऱ्या बाजूने विराट कोहली जम बसवून आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : विराट कोहलीचं वेगवान अर्धशतक, आरसीबी विजयाच्या दिशेने
विराट कोहली याने गुजरात टायटन्स विरुद्ध अंतिम सामन्यात चौकारासह अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटचं आयपीएल कारकीर्दीतील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. विराटने 25 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं. आरसीबी यासह विजयाच्या आणखी जवळ पोहचली आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : राशिद खानचा कारनामा, आरसीबीला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके
फिरकीपटू राशिद खान याने धमाका केला आहे. राशिदने आरसीबीच्या डावातील नवव्या ओव्हरमध्ये कॅप्टन रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या या दोघांना आऊट केलंय. राशिदने यासह आरसीबीला बॅकफुटवर टाकलं आहे. राशिदने 2 झटके दिल्याने आरसीबीचा स्कोअर 9 ओव्हरमध्ये 4 आऊट 91 असा झाला आहे. विराट 40 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. विराटची साथ देण्यासाठी टीम डेव्हीड मैदानात आला आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : विराट-रजत मैदानात, कोहलीला अर्धशतकाची संधी
आरसीबीने 7 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 81 रन्स केल्या आहेत. विराट कोहली 36 आणि रजत पाटीदार 10 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. त्यामुळे आता विराट अंतिम सामन्यात अर्धशतक करतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : आरसीबीला दुसरा झटका, देवदत्त पडीक्कल आऊट
कगिसो रबाडा याने देवदत्त पडीक्कल याला आऊट करत आरसीबीला दुसरा झटका दिला आहे. देवदत्त पडीक्कल याने 1 रन करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर रबाडाची ही सामन्यातील पहिली विकेट ठरली.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : आरसीबीला पहिला झटका, वेंकटेश अय्यर आऊट
मोहम्मद सिराज याने आरसीबीला पहिला झटका दिला आहे. मोहम्मद सिराज याने इम्पॅकट प्लेअर वेंकटेश अय्यर याला कगिसो रबाडा याच्या हाती कॅच आऊट केलं. वेंकटेेशने 16 बॉलमध्ये 32 रन्स केल्या.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : वेंकटेशनंतर विराटचा तडाखा, आरसीबीची रॉयल सुरुवात
वेंकटेश अय्यर याच्यानंतर विराट कोहली याने धमाका केला आहे. विराटने डावातील चौथ्या ओव्हरमध्ये कगिसो रबाडा याच्या बॉलिंगवर एकूण 19 रन्स केल्या. विराटने या खेळीत 3 फोर, 1 सिक्स आणि एकेरी धावेसह एकूण 19 रन्स मिळवल्या.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : वेंकटेश अय्यरची फटकेबाजी, आरसीबीची कडक सुरुवात
इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यर याने आरसीबीला विराट कोहली याच्या सोबतीने आक्रमक सुरुवात मिळवून दिली आहे. आरसीबीने 2 ओव्हरमध्ये बिनबाद 23 रन्स केल्या आहेत. एकट्या वेेंकटेशने या 23 पैकी 22 धावा केल्या आहेत. विराट झिरोवर नॉट आऊट खेळत आहे. वेंकटेशने कगिसो रबाडा याने टाकलेल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 फोर आणि 1 सिक्ससह 18 रन्स कुटल्या.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : आरसीबीसमोर 156 धावांचं आव्हान, विराट-वेंकटेश जोडी मैदानात
आरसीबीकडून विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर जोडी मैदानात उतरली आहे. या जोडीवर आक्रमक सुरूवात करून देण्याचं आव्हान असणार आहे. तर विकेट झटपट घेण्याचं आव्हान गुजरात टायटन्स गोलंदाजांवर असेल.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : क्लोजिंग सेरेमनीला सुरुवात, कैलाश खेरकडून शिवतांडव सादर
गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात खेळ संपल्यानंतर क्लोजिंग सेरेमनीचा रंगारंग कार्यक्रम सुरू झाला आहे. कैलाश खेरच्या गाण्याने उपस्थितांचं मनोरंजन केलं. त्याने शिवतांडव स्तोत्र गायलं.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : आरसीबीसमोर 156 धावांचं आव्हान, गुजरात जिंकणार की बंगळुरु विजयी होणार?
वॉशिंग्टन सुंदर याने केलेल्या चिवट अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर विजयासाठी 156 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 155 रन्स केल्या.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : राशीद खान आऊट, गुजरातला आठवा झटका
रसीख सलाम डार याने राशीद खान याला आऊट करत गुजरातला आठवा झटका दिला आहे. रसीखने राशीदला रोमरियो शेफर्ड याच्या हाती 7 रन्सवर कॅच आऊट केलं.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : जेसन होल्डर आऊट, गुजरातला सातवा धक्का, भुवनेश्वर कुमारकडून दुसरी शिकार
भुवनेश्वर कुमार याने विस्फोटक फलंदाज जेसन होल्डर याला जोश हेझलवूड याच्या हाती कॅच आऊट करत गुजरातला सातवा झटका दिला आहे. होल्डरने 7 रन्स केल्या. तर भुवनेश्वर कुमारची ही सामन्यातील दुसरी विकेट ठरली.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : होल्डर-सुंदर शेवटच्या टप्प्यात कमाल करणार?
राहुल तेवतिया आऊट झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि जेसन होल्डर या दोघांनी गुजरातला 18 ओव्हरनंतर 6 आऊट 137 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. सुंदर 42 आणि होल्डर 7 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. त्यामुळे ही जोडी गुजरातसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल करणार का? हे 12 चेंडूंनंतर स्पष्ट होईल.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : राहुल तेवतिया आऊट, गुजरातला सहावा धक्का
आरसीबीने गुजरात टायटन्सला सहावा झटका दिला आहे. रसीख सलाम डार याने राहुल तेवतिया याला कॅप्टन रजत पाटीदार याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. तेवतिया याने 5 बॉलमध्ये 7 रन्स केल्या.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : अर्शद खान आऊट, गुजरातचा अर्धा संघ माघारी
जोश हेझलवूड याने अर्शद खान याला रसीख सलाम डार याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. अर्शद खान याने 6 बॉलमध्ये 15 रन्स केल्या आहेत. अर्शदच्या रुपात गुजरातने पाचवी विकेट गमावली.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : कृणाल-जितेशकडून जोस बटलरचा गेम, गुजरातला चौथा झटका
कृणाल पंड्या याने आपल्या बॉलिंगवर हुशारीने वाईडच्या दिशेने बॉल टाकत जोस बटलर याला विकेटकीपर जितेश शर्मा याच्याकडून स्टंपिंग आऊट केलं आहे. बटलरने 23 बॉलमध्ये 19 रन्स केल्या.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : गुजरातच्या 10 ओव्हरनंतर 63 धावा, आरसीबी विरुद्ध मोठ्या भागीदारीची गरज
गुजरात टायटन्सने आरसीबी विरुद्ध 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 63 रन्स केल्या आहेत. जोस बटलर 14 आणि वॉशिंग्टन सुंदर 4 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. तर आरसीबीने गुजरातच्या शुबमन गिलन, साई सुदर्शन आणि निशांत सिंधू या तिघांना आऊट केलं आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : गुजरातचा तिसरा भिडू जमा, निशांत सिंधू आऊट
आरसीबीने गुजरातला तिसरा झटका दिला आहे. रसीख सलाम डार याने निशांत सिंधू याला देवदत्त पडीक्कल याच्या हाती कॅच आऊट केलं. निशांतने 18 बॉलमध्ये 20 रन्स केल्या. निशांत आऊट झाल्याने गुजरातचा स्कोअर 8 ओव्हरनंतर 3 आऊट 55 असा झाला आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : जोस बटलर-निशांत सिंधूवर गुजरातची मदार, आरसीबी तिसऱ्या शिकारच्या शोधात
आरसीबीने शुबमन गिली आणि साई सुदर्शन या सलामी जोडीसला झटपट आऊट करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आता जोस बटलर आणि निशांत सिंधू या जोडीवरवर गुजरातची मदार आहे. दोघांनी गुजरातला 5 ओव्हरमध्ये 2 आऊट 39 रन्सपर्यंत पोहचलं आहे. तर आरसीबी तिसऱ्या शिकारच्या शोधात आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final LIVE : आरसीबीची जबरदस्त सुरुवात, साई सुदर्शन आऊट, गुजरातची सलामी जोडी माघारी
जोश हेझलवूड याने कॅप्टन शुबमन गिल याला आऊट करुन आरसीबीला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर भुवनेश्वर कुमार याने गुजरातला डावातील चौथ्या बॉलवर विकेटकीपर जितेश शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. साई मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. साईने 12 बॉलमध्ये 12 रन्स केल्या. त्यामुळे गुजरातचा स्कोअर 3.4 ओव्हरमध्ये 2 आऊट 26 असा झाला आहे.
-
IPL 2026 Final LIVE Updates : कॅप्टनकडून कॅप्टनचा कॅच, शुबमन गिल आऊट, आरसीबीला मोठं यश, गुजरातला मोठा झटका
जोश हेझलवूड याने गुजरातला पहिला आणि मोठा झटका दिला आहे. हेझलवूड याने आपल्या बॉलिंगवर गुजरातचा कॅप्टन शुबमन गिल याला कर्णधार रजत पाटीदार याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. शुबमनने 8 बॉलमध्ये 10 रन्स केल्या.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Score Updates : साई-शुबमन सलामी जोडीची संयमी सुरुवात, आरसीबी पहिली विकेटच्या शोधात
साई सुदर्शन आणि शुबमन गिल या सलामी जोडीने गुजरातला संयमी सुरुवात मिळवून दिली आहे. दोघांनी 2 ओव्हरमध्ये बिनबाद 18 धावा जोडल्या आहेत. साई 9 आणि शुबमन 6 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Score Updates : राष्ट्रगीत संपन्न, सामन्याला सुरुवात, गुजरातची बॅटिंग, साई-शुबमन मैदानात
राष्ट्रगीत संपन्न झाल्यानंतर आरसीबी विरुद्ध गुजरात टायन्टस महाअंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबीने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. गुजरातकडून साई सुदर्शन आणि शुबमन गिल ही सलामी दोडी मैदानात आली आहे. तर आरसीबीकडून जेकब डफी पहिली ओव्हर टाकत आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : प्लेइंग ईलेव्हन अपडेट
आरसीबीने अंतिम सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंमध्ये बदल केलेला नाही. तर आर साई किशोर याच्या जागी गुजरात टायटन्स टीममध्ये अर्शद खान याचं कमबॅक झालं आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम दार.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन: साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कागिसो रबाडा, अर्शद खान आणि मोहम्मद सिराज.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : आरसीबीने टॉस जिंकला, गुजरात विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्स विरुद्ध अंतिम सामन्यात टॉस जिंकला आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. आता होम टीम गुजरात किती धावा करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?
आरसीबी विरुद्ध जीटी यांच्यातील अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चाहत्यांची इनकमिंग सुरु झाली आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. महाअंतिम सामन्यात कोणत्या संघाच्या बाजूने टॉसचा कॉल लागतो हे आता काही मिनिटांत स्पष्ट होईल.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : अहमदाबादमध्ये आयपीएल फायनल खेळवण्याची चौथी वेळ, कोण जिंकणार?
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं आयोजन करण्याची ही चौथी वेळ आहे. नियमानुसार, गतविजेत्या संघाच्या होम ग्राउंडमध्ये अंतिम सामन्याचं आयोजन केलं जातं. त्यानुसार आरसीबीचं होम ग्राउंड असलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन अपेक्षित होतं. मात्र या मैदानाऐवजी अहमदाबादमध्ये अंतिम सामना होणार असल्याचं बीसीसीायने स्पष्ट केलं होतं.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, मोहम्मद सिराज. निशांत सिंधू, राशिद खान, अर्शद खान आणि कगिसो रबाडा.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : आरसीबीची संभाव्य प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचे संभाव्य 11 खेळाडू : रजत पाटीदार (कर्णधार), वेंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हीड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, रसिख सलाम दार आणि जॅकब डफी.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : खेळपट्टी कशी असणार? जाणून घ्या
आरसीबी विरुद्ध गुजरात यांच्यातील सामना त्याच पीचवर खेळवण्यात येणार आहे जिथे 18 व्या हंगामातील अंतिम सामना आणि टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील फायनलचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रिकबझनुसार, हा सामना 6 नंबरच्या पीचवर होणार आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : आरसीबी-गुजरात फायनलचं काउंटडाऊन सुरु, टॉसला 2 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स अंतिम सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. आता टॉसला 2 तासांपेक्षा कमी वेळ बाकी आहे. त्यामुळे कुणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : आरसीबी-गुजरात चौथ्यांदा आमनेसामने
आरसीबी आणि गुजरात दोन्ही संघांची आयपीएल 2026 स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही चौथी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले होते. आरसीबी आणि गुजरात दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. तसेच आरसीबीने क्वालिफायर 1 सामन्यात गुजरातला पराभूत करुन फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे गुजरात आरसीबीचा गेल्या पराभवाचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : आरसीबी-गुजरात यांच्यात आकडेवारी कशी? जाणून घ्या
आरसीबी विरुद्ध जीटी या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 9 सामने झाले आहेत. या 9 सामन्यांमध्ये दोन्ही संघांत चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. आरसीबीने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर गुजरात टायटन्सने चार सामन्यांत विजय मिळवला आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : गिल-सुदर्शन जोडीच्या निशाण्यावर विराट-एबीचा रेकॉर्ड, किती धावांची गरज?
गुजरात टायटन्सची सलामी जोडी शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांच्या निशाण्यावर विराट कोहली- एबी डीव्हीलियर्स जोडीचा रेकॉर्ड आहे. विराट आणि एबी या दोघांनी ओपनिंग जोडी म्हणून एका मोसमात सर्वाधिक 939 धावा केल्या आहेत. तर साई आणि शुबमन या दोघांनी 19 व्या मोसमात 885 धावा केल्या आहेत. त्यामुळे साई-शुबमन या दोघांनी एबी-विराट जोडीला मागे टाकण्यासआठी फक्त 54 धावांची गरज आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : आयपीएल फायनलसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
आयपीएल 2026 अंतिम सामन्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे. सामना पाहायला येणाऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त असणार आहे. सामन्याआधी पोलिसांनी स्टेडियम आणि आसपासच्या परिसराची पाहणी केली. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी यांनी पोलिसांनी केलेल्या स्टेडियमच्या पाहणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
गुजरात पोलीस फायनलसाठी सज्ज, स्टेडियम आणि परिसरात कडेकोट बंदोबस्त
IPL 2026 Finals ahead, our police team is always on the front foot, fully prepared to ensure safety, smooth management and a secure experience for every cricket fan.#Ipl2026finals pic.twitter.com/ckk1ErTmTZ
— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) May 31, 2026
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : आरसीबीसमोर शुबमन गिल-साई सुदर्शनला रोखण्याचं आव्हान
आरसीबीसमोर अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सची सलामी जोडी शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांना स्वस्तात रोखण्याचं आव्हान असणार आहे. या दोघांनी 19 व्या सिझमधील 16 सामन्यांत एकूण 885 धावा केल्या आहेत. तसेच दोघांनी ओपनिंग जोडी म्हणून स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 11 वेळा शतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे आरसीबीचे गोलंदाज या दोघांना रोखण्यात यशस्वी ठरतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : विराट कोहली विरुद्ध शुबमन गिल यांच्या कामगिरीकडे लक्ष
आयपीएल 2026 अंतिम सामन्याच्या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांना विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्यात मोठी रायव्हलरी पाहायला मिळणार आहे. विराट आणि शुबमन हे दोघे त्यांच्या संघातील मोठे आणि मॅचविनर खेळाडू आहेत. त्यामुळे हे दोघे अतिशय महत्त्वाच्या सामन्यात कायम कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : आरसीबीने साखळी फेरीत 14 पैकी किती सामने जिंकले?
आयपीएल स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रत्येक संघाला 14 सामने खेळण्याची संधी मिळते. आरसीबीला 10 सामने जिंकण्याची संधी होती. मात्र आरसीबी 10 वा सामना जिंकण्यात अपयशी ठरली. आरसीबीने गुजरातप्रमाणे 9 सामने जिंकले तर 5 वेळा पराभव झाला. मात्र नेट रनरेट चांगला असल्याने आरसीबी साखळी फेरी संपल्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी राहण्यात यशस्वी ठरली.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : गुजरातची साखळी फेरीतील कामगिरी
गुजरातने साखळी फेरीत एकूण 14 सामने खेळले. गुजरात 14 पैकी 9 सामने जिंकण्यात यशस्वी ठरली. तर गुजरातला 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. गुजरात साखळी फेरीनंतर दुसऱ्या स्थानी राहिली.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : गुजरात आरसीबीला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्यापासून रोखणार का?
गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याची संधी आहे. मात्र गुजरात आरसीबीला सलग दुसऱ्यांचा चॅम्पियन होण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरणार का? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. आरसीबीने गेल्या वर्षी पंजाब किंग्सला पराभूत करुन तब्बल 18 वर्षांची प्रतिक्षा संपवत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आता आरसीबीला सलग दुसरी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : गुजरात टायटन्स टीम
गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधु, वाशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशिद खान, अरशद खान, कगिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, राहुल तेवतिया, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, प्रसिद्ध कृष्णा, कुलवंत खेजरोलिया, इशांत शर्मा, कॉनर एस्टरहुइजन जयंत यादव, शाहरुख खान, मानव सुतार, कुमार कुशाग्र, गुरनूर बरार, अशोक शर्मा आणि ल्यूक वुड.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : रजत पाटीदार (कर्णधार), जॅकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, वेंकटेश अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हीड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवुड, सुयश शर्मा, रसिख सलाम डार, जॉर्डन कॉक्स, अभिनंदन सिंह, स्वप्निल सिंह, कनिष्क चौहान, फिल सॉल्ट, विक्की ओस्तवाल, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, सात्विक देसवाल, रिचर्ड ग्लीसन आणि जॅकब डफी.
-
RCB vs GT IPL 2026 Final Live Updates : गुजरात-आरसीबी महाअंतिम सामना, कोण ठरणार विजेता?
साखळी फेरी, क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 अशा सर्व सामन्यांनंतर अखेर अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. आयपीएल ट्रॉफीसाठी 19 व्या मोसमातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.