AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs GT Qualifier 1 : आरसीबीची विक्रमी कामगिरी, गुजरातसमोर 255 धावांचं महाकाय आव्हान, कोण पोहचणार फायनलमध्ये?

Highest Total Runs Record In Playoffs : गुजरात टायटन्ससमोर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आरसीबी विरुद्ध अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्यासह मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

RCB vs GT Qualifier 1 : आरसीबीची विक्रमी कामगिरी, गुजरातसमोर 255 धावांचं महाकाय आव्हान, कोण पोहचणार फायनलमध्ये?
Venkatesh Iyer and Virat Kohli RcbImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 26, 2026 | 10:58 PM
Share

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) क्वालिफायर 1 सामन्यात इतिहास घडवला आहे. आरसीबीने या निर्णायक आणि अतिशय महत्त्वाच्या सामन्यात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये गुजरात टायटन्ससमोर 255 धावांचं महाकाय आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने रजत पाटीदार याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात विरुद्ध 5 विकेट्स गमावून 254 धावा केल्या. त्यामुळे आता आरसीबी हा सामना जिंकून थेट फायनलचं तिकीट मिळवणार की गुजरात अंतिम फेरीत धडक देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरसीबीकडून गुजरातचा रेकॉर्ड ब्रेक

आरसीबीने गुजरात विरुद्ध 255 धावा करण्यासह आपल्या विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे. त्याशिवाय आरसीबीने मोठा विक्रम मोडीत काढला आहे. आरसीबीने प्लेऑफमध्ये गुजरातच्या नावावर असलेला सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आरसीबीने 234 धावा करताच हा विक्रम मोडीत काढला.

आरसीबीआधी प्लेऑफमधील एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गुजरातच्या नावावर होता. गुजरातने 2023 साली क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध 3 विकेट्स गमावून 233 रन्स केल्या होत्या. त्यानंतर तब्बल 3 वर्षांनी आरसीबी हा विक्रम मोडीत काढण्यात यशस्वी ठरली आहे.

रजत, विराट आणि कृणालचा तडाख

आरसीबीसाठी रजत व्यतिरिक्त विराट कोहली आणि कृणाल पंड्या या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. रजत पाटीदार याने 33 बॉलमध्ये नॉट आऊट 93 रन्स केल्या. रजतने या खेळीत 9 सिक्स आणि 5 फोर ठोकले. तर विराट आणि कृणाल या दोघांनी प्रत्येकी 43-43 धावा केल्या. देवदत्त पडीक्कल याने 30 धावा जोडल्या. वेंकटेश अय्यर याने 19 रन्स केल्या. तर जितेश शर्मा याने नाबाद 15 धावांचं योगदान दिलं. गुजरातसाठी जेसन होल्डर आणि कगिसो रबाडा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर प्रसिध कृष्णा याने 1 विकेट मिळवली.

आरसीबीची ऐतिहासिक कामगिरी

गुजरातकडे पंजाब किंग्सचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

दरम्यान आतापर्यंत प्लेऑफच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम हा पंजाब किंग्सच्या नावावर आहे. पंजाबने 2025 साली मुंबई इंडियन्स विरुद्ध 204 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे गुजरात आरसीबी विरुद्ध किती धावांपर्यंत पोहचते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी