Rishabh Pant: ‘असं करुन तू संपत्ती नक्की कमवशील, पण…’, प्रसिद्ध गायिकेने सुनावल्यानंतर ऋषभने हटवला ‘तो’ VIDEO

Rishabh Pant ला ज्या Video साठी मिळाले कोट्यवधी रुपये, तोच करावा लागला डिलीट

Rishabh Pant: असं करुन तू संपत्ती नक्की कमवशील, पण..., प्रसिद्ध गायिकेने सुनावल्यानंतर ऋषभने हटवला तो VIDEO
Kaushiki-Rishabh pant
Image Credit source: instagram
| Updated on: Dec 12, 2022 | 1:41 PM

मुंबई: ऋषभ पंतचा सध्या खराब काळ सुरु आहे. त्याच्या धावा होत नाहीयत. त्यामुळे तो टीकाकारांच्या रडारवर आहे. मैदानात संघर्ष करणाऱ्या ऋषभ पंतच्या मैदानाबाहेरही अडचणी कमी होत नाहीयत. पंत भारतीय क्रिकेटमधील एक मोठ नाव आहे. त्यामुळे अनेक ब्रांड्सची तो पसंत आहे. ऋषभ पंत अनेक जाहीरातींमध्ये दिसतो. अशाच एका ब्रांडच्या जाहीरातीवरुन पंत टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. हा विकेटकीपर फलंदाज ड्रीम-11 च्या अनेक जाहीरात करतो. आता अशाच एका जाहीरातीवरुन पंत अडचणीत आलाय.

‘या’ जाहीरातीवरुन झाला वाद

ड्रीम-11 च्या एका जाहीरातीवरुन वाद झाला आहे. त्यावरुन पंतला अनेकांनी सुनावलं. अखेरीस पंतने सोमवाारी त्याच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवरुन हा व्हिडिओ हटवला. ड्रीम-11 एक फँटेसी क्रिकेट APP आहे. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या सुद्धा त्यांच्या जाहीराती करतात. पंतला ड्रीम-11 सोबत काम करण्यासाठी कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.

असा आहे व्हिडिओ

पंतने आपल्या मनाच ऐकून क्रिकेट बनण्याचा योग्य निर्णय घेतला, असं या जाहीरातीत म्हटलं आहे. पंत क्रिकेटर नसता, तर काय असता? असं त्या जाहीरातीत दाखवलय. पंत एका गायकाच्या भूमिकेत दिसत होता. या जाहीरातीत पंतला एक वाईट गायक म्हणून दाखवलं आहे. “मी देवाचा आभारी आहे. मी माझं स्वप्न फॉलो केलं आणि क्रिकेटर बनलो” असं त्याने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

त्या जाहीरातीचा अर्थ काय ?

पंत क्रिकेट सोडून गायक बनला असता किंवा अन्य क्षेत्रात करीअर केलं असतं, तर तो योग्य निर्णय ठरला नसता असे त्या जाहीराती मागचा अर्थ आहे. त्यानंतर अनेकांनी त्या जाहीरातीचा समाचार घेतला.


असं करुन तू संपत्ती नक्की कमवशील, पण…

सोशल मीडियावर अनेकांनी ऋषभच्या या जाहीरातीवर कमेंट्स केल्या. यात प्रसिद्धी गायिका कौशिकी सुद्धा आहे. “या किळसवाण्या, घाणेरड्या जाहीरातीवर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयत. आपल्याला मिळालेल्या वारशाचा अनादर करुन तुम्ही मूर्ख ठरता, ऋषभ पंत. हे पंडित रवीशंकर, उस्ताद झाकीर हुसैन, पंडीत भीमसेन जोशी यांचं संगीत आहे. असं करुन तू संपत्ती नक्की कमवशील. पण त्याला अर्थ आहे का?” अशा शब्दात कौशिकीने आपला संताप व्यक्त केला.


कौशिकी यांनी काय म्हटलय?

पंतने आपल्या टि्वटर हँडलवरुन हा व्हिडिओ हटवल्यानंतर कौशिकने आनंद व्यक्त केला. “हा व्हिडिओ टि्वटरवरुन डिलीट केल्याबद्दल मी ऋषभचे आभार मानते. व्यक्तीगत स्तरावर माझी त्याच्याबद्दल कुठलीही तक्रार नाहीय. मी त्याला त्याच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देते” असं कौशिकीने तिच्या टि्वटमध्ये म्हटलय.