Riyan Parag : आजारातून उठला, पेनकिलर्स घेऊन मैदानात उतरला, त्यानंतर 7 फोर, 6 SIX एका जिद्दीची गोष्ट

| Updated on: Mar 29, 2024 | 10:56 AM

रियान परागला राजस्थान रॉयल्सने 2019 मध्ये विकत घेतलं होतं. त्याच्यावरुन बरेच वाद, टीका झाली, तरीही राजस्थान फ्रेंचायजीने त्याला टीममध्ये ठेवलं. 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रेंचायजीने पुन्हा एकदा त्याच्यावर मोठी रक्कम खर्च केली. आज त्याच फळ मिळतय.

Riyan Parag : आजारातून उठला, पेनकिलर्स घेऊन मैदानात उतरला, त्यानंतर 7 फोर, 6 SIX एका जिद्दीची गोष्ट
राजस्थान रॉयल्सचा स्टार फंलदाज रियान पराग दुसऱ्या क्रमांकावर आहे. रियानने 7 सामन्यात 20 सिक्सच्या मदतीने एकूण 318 धावा केल्या आहेत.
Image Credit source: PTI
Follow us on

IPL च्या प्रत्येक सीजनमध्ये दिग्गज खेळाडू कसं प्रदर्शन करतात? त्याकडे सगळ्यांच लक्ष असतं. त्याशिवाय कुठला नवा खेळाडू लक्षवेधी कामगिरी करणार? याकडेही क्रिकेट फॅन्स नजर ठेऊन असतात. यंदाच्या सीजनमध्ये रियान पराग असाच एक प्लेयर आहे. मागच्या दोन सीजनपासून त्याची चर्चा आहे. खेळापेक्षा वादांसाठी रियान परागची जास्त चर्चा झाली. त्याला ट्रोल करण्यात आलं. त्याच्यावर टीका झाली. पण आयपीएल 2024 च्या सीजनमध्ये रियान पराग त्याच्या खेळामुळे चर्चेत आहे. आजारपणाशी झुंज देत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रियान पराग एक सुंदर इनिंग खेळला.

जयपूर येथे गुरुवारी 28 मार्चला झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत केलं. रियान परागच्या 84 धावांच्या दमदार खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने हा विजय मिळवला. रियान पराग क्रीजवर आला, तेव्हा राजस्थानची धावसंख्या 2 बाद 30 धावा होती. 36 रन्सवर टीमचा तिसरा विकेट पडला. मात्र, तरीही राजस्थानने 185 धावांचा डोंगर रचला, याच कारण आहे रियान पराग.

कठीण परिस्थितीशी झुंज देत ही इनिंग

आसामच्या या 22 वर्षाच्या युवा फलंदाजाने फक्त 45 चेंडूत 84 धावा चोपल्या. यात 25 धावा शेवटच्या षटकात वसूल केल्या. हे 25 रन्सच निर्णायक ठरले. विजयानंतर रियान परागलाच प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आलं. कठीण परिस्थितीशी झुंज देत ही इनिंग खेळल्याच रियान परागने सांगितलं.

दिवस ढकलत होता

रियान मागच्या 3 दिवसांपासून आजारी होता. बिछान्यात पडून होता. बिछान्यातून उठण देखील त्याच्यासाठी कठीण बनलं होतं. पेनकिलर घेऊन तो दिवस ढकलत होता. “या मॅचमध्ये खेळून टीमच्या विजयात योगदान देऊ शकलो, याच समाधान आहे” असं रियान पराग म्हणाला.

कधीपासून राजस्थान रॉयल्स टीमसोबत?

आयपीएल 2019 पासून रियान पराग राजस्थान रॉयल्स टीममध्ये आहे. त्यावेळी राजस्थानने त्याला 20 लाख रुपयाच्या बेस प्राइसला विकत घेतलं होतं. सलग 3 वर्ष रिटेन केलं. त्याला सतत संधी मिळायची. पण अपेक्षेनुसार कामगिरी त्याच्याकडून होत नव्हती. 2022 च्या सीजनआधी मेगा ऑक्शन झालं. त्यात राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा त्याच्यावर बोली लावली. 3.80 कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं. दोन सीजन तो खास काही करु शकला नाही. आता तिसऱ्या सीजनमध्ये तो त्याच्या क्षमतेनुसार खेळतोय. पहिल्या सामन्यात रियान 43 धावांची इनिंग खेळला होता.