Rohit Sharma New Car: रोहित शर्माने खरेदी केली भारताच्या जर्सीला साजेशी आलिशान कार, किंमत मुंबईतल्या 3BHK फ्लॅटएवढी

| Updated on: Mar 02, 2022 | 12:39 PM

धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) जेव्हापासून टीम इंडियाच्या पूर्णवेळ कर्णधारपदाची धुरा हाती घेतली आहे, तेव्हापासून भारताला केवळ विजयच मिळत आहेत. रोहित शर्माचा आता भारतीय क्रिकेटमध्ये दबदबा आहे, तो तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला आहे.

Rohit Sharma New Car: रोहित शर्माने खरेदी केली भारताच्या जर्सीला साजेशी आलिशान कार, किंमत मुंबईतल्या 3BHK फ्लॅटएवढी
Rohit Sharma buys New Lamborghini Urus
Follow us on

मुंबई : धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) जेव्हापासून टीम इंडियाच्या पूर्णवेळ कर्णधारपदाची धुरा हाती घेतली आहे, तेव्हापासून भारताला केवळ विजयच मिळत आहेत. रोहित शर्माचा आता भारतीय क्रिकेटमध्ये दबदबा आहे, तो तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या या नवीन कर्णधाराने एक नवीन लक्झरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. रिपोर्टनुसार, रोहित शर्माने नवीन लॅम्बोर्गिनी उरूस (Lamborghini Urus) ही लक्झरी कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या कारचा रंग टीम इंडियाच्या टी-शर्टशी जुळणारा निळा आहे. रोहित शर्माच्या या नवीन लक्झरी कारची (Luxury Car) किंमत 3.10 कोटी रुपये आहे.

रोहित शर्माला गाड्यांची खूप आवड आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण आता टीम इंडियाच्या कॅप्टनच्या गॅरेजमध्ये ही नवी आलिशान कारही दाखल झाली आहे. रोहित शर्माने त्याच्या आवडीनिवडीनुसार या नवीन कारमध्ये काही नवीन फीचर्स जोडले आहेत.

यात स्पोर्टिव्हो लेदर इंटीरियर, 22 इंच डायमंड कट रिम्स देखील आहेत. रोहित शर्मा देशातील काही मोजक्या लोकांपैकी एक आहे ज्यांच्याकडे ही कार आहे. रोहित शर्माने गाडीचे इंटिरिअर देखील विशेष डिझाईन करुन घेतलं आहे. ज्यामध्ये रेड-ब्लॅक केबिनचा समावेश आहे. तसेच वाहनाचा डॅशबोर्डही काळ्या आणि लाल रंगात बनवण्यात आला आहे.

टी-20 नंतर तो आता एकदिवसीय आणि कसोटी संघाचाही कर्णधार बनला आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. तसेच सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

इतर बातम्या

Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Salil Ankola: 28 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती, मग बॉलिवूड गाजवलं, आता मुंबई क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी

Russia Ukraine War: रशियन फौजांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं केविन पीटरसनचं कुटुंब