रोहितचं कर्णधारपद फार काळ टिकणार नाही; निवड समितीच्या माजी सदस्याचं मोठं विधान

| Updated on: Nov 03, 2021 | 5:39 PM

विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीनंतर वनडे फॉरमॅटमध्येही नेतृत्व बदलाची कुजबुज सुरू आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाची कमान कोणाकडे जाणार याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसून उपकर्णधार रोहित शर्माचे नाव साहजिकच पुढे आहे.

रोहितचं कर्णधारपद फार काळ टिकणार नाही; निवड समितीच्या माजी सदस्याचं मोठं विधान
Rohit Sharma
Follow us on

दुबई : 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघात नेतृत्व बदल आधीच ठरले होते. कर्णधार विराट कोहलीने विश्वचषक सुरू होण्याच्या एक महिना अगोदर T20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. आता विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीनंतर वनडे फॉरमॅटमध्येही नेतृत्व बदलाची कुजबुज सुरू आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाची कमान कोणाकडे जाणार याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसून उपकर्णधार रोहित शर्माचे नाव साहजिकच पुढे आहे, मात्र भविष्यातील तयारी पाहता काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सरनदीप सिंग (Sarandeep Singh) यांचाही असा विश्वास आहे की, रोहित ही पहिली पसंती असू शकतो परंतु तो दीर्घकालीन योजनेचा भाग होऊ शकत नाही, किंवा तो कर्णधार म्हणून दीर्घकालीन पर्याय असू शकत नाही. (Rohit Sharma can’t be long-term captaincy option, says Sarandeep Singh)

टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला लगेचच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे आणि पहिल्यांदाच संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. येत्या काही दिवसांत बीसीसीआयचे निवडकर्ते या मालिकेसाठी संघ निवडीसोबतच कर्णधाराबाबतही निर्णय घेतील. रोहित शर्मा नियमित कर्णधार बनणार आहे. रोहित या मालिकेचा भाग असेल की नाही हे स्पष्ट झाले नसले तरी पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-20 विश्वचषकासाठी तो कर्णधार असेल हे जवळपास निश्चित आहे.

रोहितला पहिली पसंती, मात्र दीर्घकालीन पर्याय नाही

33 वर्षीय रोहित शर्माचे वय आणि पुढील काही वर्षांत संघात होणारे बदल लक्षात घेऊन भविष्यातील तयारीनुसार कर्णधार बनवावा, अशीही मागणी होत आहे. किंवा त्यानुसार नेतृत्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये युवा खेळाडूंचा समावेश करावा. या संदर्भात माजी फिरकीपटू आणि निवडकर्ता सरनदीप सिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

“रोहित हा चांगला पर्याय आहे. तो तुमच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण निवड समितीने त्याला काही वर्षांसाठी (2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत) कर्णधार बनवायचे की दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करू शकणाऱ्या खेळाडूवर जबाबदारी सोपवायची हे ठरवायचे आहे. जर ते खूप पुढचा विचार करत असतील तर केएल राहुल आणि ऋषभ पंत हे चांगले पर्याय असू शकतात.

इतर बातम्या

T20 World Cup India vs Afghanistan live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना

T20 World Cup 2021: आधी सामन्यात पराभूत केल्यानंतर आता विराटच्या मोठ्या रेकॉर्डलाही बाबरची गवासणी, नामिबियाविरुद्ध विक्रमाची नोंद

2007 वर्ल्ड कपमध्येही भारताने 2 चुका केल्या, त्याच चुका आताही, रोहितला ओपनिंग करु न दिल्याने वीरेंद्र सेहवाग भडकला

(Rohit Sharma can’t be long-term captaincy option, says Sarandeep Singh)