न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्माने दिलं असं उदाहरण, म्हणाला…

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवला आहे. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी आणि अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माने एक उदाहरण दिलं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्माने दिलं असं उदाहरण, म्हणाला...
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 3:05 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 साखळीतील कसोटी मालिका सुरु आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने आपल्या खिशात घातला. न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर मालिकेत कमबॅकसाठी टीम इंडियाची धडपड असणार आहे. उर्वरित दोन सामन्यात टीम इंडिया कशी कमागिरी करते याकडे लक्ष लागून आहे. मालिका विजयासोबत टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित उर्वरित दोन सामन्यांवर अवलंबून आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर उर्वरित दोन सामन्यांबाबत सांगताना इंग्लंड मालिकेचं उदाहरण दिलं आहे. कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘आम्ही हा पराभव सकारात्मक घेऊन पुढे जाणार आहोत. आमच्या संघातील सहकाऱ्यांनी यापूर्वी अशी परिस्थिती हाताळली आहे. आम्ही इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना गमावला होता. त्यानंतर इतर चार सामन्यात अशी विजय मिळवला होता. आता या मालिकेतील दोन सामने शिल्लक आहेत. प्रत्येकाला या दोन सामन्यात काय करायचं आहे याचं भान आहे. आम्ही पुढच्या सामन्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि पुढे जाऊ.’

बंगळुरु कसोटी न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. यासह रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. महेंद्रसिंह धोनी, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरसह नको त्या पंगतीत बसला आहे.रोहित शर्मा घरच्या मैदानावर तीन कसोटी सामने गमवणारा पाचवा कर्णधार ठरला आहे. भारतीय भूमीत बिशनसिंह बेदी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनीने तीन सामने गमावले आहेत.दुसरीकडे, 36 वर्षांनंतर न्यूझीलंडने भारतीय भूमीवर कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने 1988 मध्ये भारतात शेवटचा कसोटी सामना जिंकला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 24 ऑक्टोबरला दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामन्यात पुण्यात होणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरला असणार आहे. त्यानंतर टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. या मालिकेत भारताची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.