मुंबईचा राजा…! असं म्हणताच रोहित शर्माने चाहत्यांना केली विनवणी, काय झालं पाहा व्हायरल Video

टीम इंडियाच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा चाहत्यांना विनवणी करताना दिसत आहे. मुंबई राजा रोहित शर्मा... या घोषणेनंतर त्याने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

मुंबईचा राजा...! असं म्हणताच रोहित शर्माने चाहत्यांना केली विनवणी, काय झालं पाहा व्हायरल Video
मुंबईचा राजा...! असं म्हणताच रोहित शर्माने चाहत्यांना केली विनवणी, काय झालं पाहा व्हायरल Video
Image Credit source: video grab
| Updated on: Sep 06, 2025 | 4:31 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर टीम इंडियाचा वनडे कर्णधार मैदानापासून लांब आहे. कारण तेव्हापासून आतापर्यंत एकही वनडे मालिका झालेली नाही. रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटला रामराम ठोकला आहे. आता फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना त्यांच्या मैदानात परतण्याची उत्सुकता आहे. पुढच्या महिन्यात भारतीय संघ वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तेव्हा 38 वर्षीय रोहित शर्मा मैदानात दिसण्याची शक्यता आहे. यासाठी तो खूप मेहनत देखील घेत आहे.तसेच मैदानाव्यतिरिक्त कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव धूमधडाक्यात सुरु आहे. असं असातना रोहित शर्मा लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता. तेव्हा त्याची एक क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण तेव्हा चाहत्यांनी त्याला पाहताच ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ अशा घोषणाबाजी सुरु केली. पण रोहित शर्माने त्यांना थांबवलं.

भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतंच मुंबईतील वरळी येथे गणपतीचे दर्शन घेतले. रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती.चाहत्यांनी ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ असा जयघोष करताच रोहित शर्माने त्यांना हात जोडून विनंती केली की असं करू नका. त्याच्या या विनंतीचा चाहत्यांनी देखील मान ठेवला आणि गप्प बसले. रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याच्या या कृतीचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

एका युजर्सने लिहिलं की, रोहित शर्माचा नम्र भाव कोणत्याही जयघोषापेक्षा आवडला. त्याच्याकडे इतकी सारी संपत्ती असून अहंकार नाही, त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व आणखी खुलतं. दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, रोहित शर्माने दाखवून दिलं की तो बाप्पा राजा आहे. त्यामुळे त्याने गणपतीला बाप्पााला पहिलं स्थान दिलं. तिसऱ्या युजर्सने लिहिलं की, रोहित शर्मा हा चांगलं व्यक्तिमत्व आहे. मला त्याची ही भावना आवडली. त्याने गणपती मंडळात माझ्या नावाने ओरडू नका. उलट बाप्पाचा जप करा असं सांगितलं.