टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी रोहित शर्मा सज्ज! ‘त्या’ सहा शब्दात बरंच काही सांगून गेला

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कमबॅक केलं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडू सज्ज असतील याचे संकेत मिळाले आहे. कर्णधार रोहित शर्मा यानेही नववर्षात नवा संकल्प असल्याचे संकेत दिले आहेत.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी रोहित शर्मा सज्ज! त्या सहा शब्दात बरंच काही सांगून गेला
टी20 मालिकेचं कर्णधारपद मिळण्याआधीच रोहित शर्माची वर्ल्डकपसाठी मोर्चेबांधणी! असा असेल नववर्षात संकल्प
| Updated on: Jan 08, 2024 | 5:35 PM

मुंबई : नववर्ष 2024 सुरु झालं असलं तरी क्रिकेटरसिकांच्या मनात 2023 च्या कटू आठवणी ताज्या आहेत. आयसीसी चषक जिंकण्याचं स्वप्नही अजूनही बाकी आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर क्रीडारसिकांचा हिरमोड झाला होता. आता टीम इंडिया पुन्हा एकदा नव्या जोमाने सज्ज झाली आहे. पण टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी झाले आहेत. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा कोणाकडे सोपवायची हा प्रश्न उभा राहिला आहे. टीम इंडियाकडे टी20 वर्ल्डकपसाठी अवघ्या 5 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. 5 जूनला टीम इंडियाला पहिला सामना खेळणार आहे. अशात टीम इंडियाची धुरा सांभाळणार सक्षम कर्णधार संघाकडे असणं गरजेचं झालं आहे. हार्दिक पांडयाचं वारंवार दुखापतग्रस्त होणं टीम इंडियाला त्रासदायक आहे. त्यामुळे रोहित शर्माकडे आशादायची चेहरा म्हणून पाहिलं जात आहे. त्याचे संकेत अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून मिळाले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेत इंग्लंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तेव्हापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटपासून दूर आहे. आता दीड वर्षानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं टी20 संघात पुनरागमन झालं आहे. इतकंच काय तर रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

कर्णधारपदाची धुरा मिळण्यापूर्वी रोहित शर्माने दक्षिण अफ्रिकेत मालिका बरोबरीत सोडवल्याचे फोटो ट्वीट केले होते. तसेच सहा शब्दात नववर्षाचा संकल्प जाहीर केला होता. यात त्याने नववर्षाची जबरदस्त सुरुवात झाल्याचं नमूद केलं आहे. “व्हॉट अ स्टार्ट टू द इअर”, असं ट्वीट रोहित शर्माने केलं आहे.

हार्दिक पांड्या फिट होणार की नाही हे आता येणारा काळच सांगेल. दुसरीकडे, रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिकेचं कर्णधारपद सोपवून पर्याय तयार असल्याचं सांगितलं आहे. रोहित शर्माकडे टी20 वर्ल्डकपचं कर्णधारपद मिळालं आयसीसी चषक जिंकण्याची एक संधी असेल. आता येणाऱ्या काळातच काही गोष्टी स्पष्ट होतील.