टी20 मालिकेसाठी रोहित शर्माला कर्णधारपद मिळताच मुंबई इंडियन्सचा मस्का! करून दिली 13 वर्षापूर्वीची आठवण

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर रोहित शर्माचे तारे फिरले होते. एका पाठोपाठ एक धक्के मिळाले. पण दक्षिण अफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली आणि ग्रहांची उत्तम साथ मिळाली. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा मिळाली. त्यानंतर आता रोहित शर्माची चलती सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्सननेही खास ट्वीट केलं आहे.

टी20 मालिकेसाठी रोहित शर्माला कर्णधारपद मिळताच मुंबई इंडियन्सचा मस्का! करून दिली 13 वर्षापूर्वीची आठवण
रोहित शर्माला आधी कर्णधारपदावरून काढलं आता आठवला 13 वर्षांपूर्वीचा क्षण, मुंबई इंडियन्सने काय केलं पाहा
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 5:00 PM

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. जवळपास दीड वर्षानंतर रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे. पण वर्ल्डकप अंतिम फेरीचा सामना ते दक्षिण अफ्रिकेविरुद्धची टेस्ट मालिका या मधील प्रवासात बरंच काही घडलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयपीएल 2024 स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या खांद्यावरील मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी टीकास्त्र सोडलं होतं. इतकंच काय तर एका दिवसात मुंबई इंडियन्सला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या कमी झाली होती. पण नववर्षात रोहित शर्माला पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळाली आहे. टी20 फॉरमॅटमध्ये रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. इतकंच काय तर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी असल्याने कर्णधारपदाची धुराही त्याच्या खांद्यावर पडली आहे. टी20 वर्ल्डकप 2024 च्या दृष्टीने ही जबाबदारी खूपच महत्त्वाची मानली जाते. आता मुंबई इंडियन्सने ट्वीट करत 13 वर्षांपूर्वीच्या आठवणी जागा केल्या आहेत.

रोहित शर्मा आजपासून 13 वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रुजू झाला होता. 8 जानेवारी 2011 साली रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघात आला होता. जवळपास 9 कोटींची रक्कम मोजून त्याला संघात घेतलं होतं. त्यानंतर रोहित शर्माच्या खांद्यावर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मुंबई इंडियन्सने ट्वीट करत लिहिलं आहे की, “13 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रोहित शर्मा निळ्या सोनेरी रंगाच्या जर्सीत दिसला होता. ” त्याचबरोबर वन फॅमिली, मुंबई इंडियन्स असा हॅशटॅग टाकत रोहित शर्माला टॅग केलं आहे.

मुंबई इंडियन्सने असं ट्वीट करताच त्याखाली उत्स्फुर्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहे. अनेकांना या ट्वीटखाली आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाच वेळा जेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला अशा पद्धतीने कर्णधारपदावरून काढणं शोभलं का? असं एका युजर्सने लिहिलं आहे. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, हार्दिक पांड्या जखमी असल्याने आता मस्का मारला जात आहे. तर तिसऱ्या युजर्सने लिहिलं की, आता किती जवळीक साधण्याचा प्रयत्न तुटलेलं मन जुळून येणार नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा एक समीकरण तयार झालं होतं. पण हार्दिक पांड्याला कर्णधारपद सोपताच चाहते नाराज झाल्याचं दिसून येत आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.