RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : आरसीबीचं अर्धशतक पूर्ण, विराट-देवदत्त पडीक्कल मैदानात

RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates IPL 2026 Live Updates in Marathi: गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्याची संधी आहे. आरसीबीसमोर क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सचं आव्हान आहे.

RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : आरसीबीचं अर्धशतक पूर्ण, विराट-देवदत्त पडीक्कल मैदानात
RCB vs GT IPL 2026 Qualifier 1
Image Credit source: TV9
| Updated on: May 26, 2026 | 7:55 PM

LIVE Cricket Score & Updates

  • 26 May 2026 07:55 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : आरसीबीचं अर्धशतक पूर्ण, विराट-देवदत्त पडीक्कल मैदानात

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात विरुद्ध जबरदस्त सुरुवात केली आहे. आरसीबीने जीटी विरुद्ध पहिल्या 4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 50 धावा केल्या आहेत. विराट कोहली 14 आणि देवदत्त 17 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 26 May 2026 07:46 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : आरसीबीला पहिला झटका, वेंकटेश अय्यर आऊट, शुबमनकडून कडक कॅच

    कगिसो रबाडा याने वेंकटेश अय्यर याला आऊट करत आरसीबीला पहिला झटका दिला आहे. कॅप्टन शुबमन गिल याने रबाडाच्या बॉलिंगवर वेंकटेशचा उलट धावत अप्रतिम कॅच घेतला. वेंकटेशने 7 बॉलमध्ये 19 रन्स करुन आरसीबीला स्फोटक सुरुवात करुन देण्याचा प्रयत्न केला. मात्र याच प्रयत्नात तो आऊट झाला.

  • 26 May 2026 07:32 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : सामन्याला सुरुवात, आरसीबीची बॅटिंग, विराट-वेंकटेश सलामी जोडी मैदानात

    आरसीबी विरुद्ध गुजरात क्वालिफायर 1 सामन्याला सुरुवात झाली आहे.  गुजरातने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आरसीबीकडून विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर ही सलामी जोडी मैदानात आहे. तर गुजरातसाठी मोहम्मद सिराज पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज आहे.

  • 26 May 2026 07:11 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : वेंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम दार.

  • 26 May 2026 07:10 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन

    गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कुलवंत खेजरोलिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

  • 26 May 2026 07:04 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : गुजरातने टॉस जिंकला, आरसीबी विरुद्ध निर्णय काय?

    गुजरात टायटन्सने क्वालिफायर 1 सामन्यात टॉस जिंकला आहे. गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गुजरातचे गोलंदाज आरसीबीला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 May 2026 06:50 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : आरसीबी आणि गुजरात सामना, थोड्याच वेळात टॉस

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामन्याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. कोणत्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 May 2026 06:44 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : शुबमन-विराटच्या कामगिरीकडे लक्ष

    आरसीबी विरुद्ध गुजरात क्वालिफायर 1 सामन्यानिमित्ताने क्रिकेट चाहत्यांचंं शुबमन गिल आणि विराट कोहली या दोघांच्या कामगिरीकडे बारीक लक्ष असणार आहे. विराट आणि शुबमन दोन्ही खेळाडू हे त्यांच्या संघातील प्रमुख फलंदाज आहेत. त्यामुळे टीम मॅनेजमेंटंला या दोघांकडून मोठ्या खेळीची आशा असणार आहे.

  • 26 May 2026 06:36 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : आरसीबी आणि गुजरातपैकी वरचढ कोण?

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 8 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ आकड्यांवरुन तुल्यबळ असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे क्वालिफायर 1 सामन्यात कोणता संघ सरस ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 26 May 2026 06:24 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : आरसीबी आणि गुजरातची साखळी फेरीतील कामगिरी

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांची साखळी फेरीतील कामगिरी सारखीच राहिली आहे. दोन्ही संघांनी 14 पैकी 9 सामने जिंकले. आरबीसी साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानी राहिली. त्यामुळे आता क्वालिफायर 1 मध्ये कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 May 2026 06:13 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : गुजरात टायटन्स टीम

    गुजरात टायटन्स टीम : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कागिसो रबाडा, अर्शद खान, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्रा, रविश्रीनिवासन साई किशोर, शाहरुख खान, इशांत शर्मा, ल्यूक वुड, अशोक शर्मा, कॉनर एस्टरहुइझेन, गुरनूर ब्रार, मानव सुथार आणि जयंत यादव.

  • 26 May 2026 06:11 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार,
    सुयश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, फिलिप सॉल्ट, अभिनंदन सिंग, स्वप्नील सिंग, जॉर्डन कॉक्स, कनिष्क चौहान, जेकब डफी, रिचर्ड ग्लीसन, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा, मंगेश यादव आणि सात्विक देसवाल.

  • 26 May 2026 06:09 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : आरसीबी-गुजरात क्वालिफायर 1 साठी सज्ज

    आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वालिफायर 1 सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. तर पराभूत संघाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी अतिरिक्त संधी मिळणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील प्लेऑफ फेरीच्या थराराला 26 मे पासून सुरुवात झाली आहे. प्लेऑफमधील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या क्वालिफायर 1 सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. शुबमन गिल गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर रजत पाटीदार याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल. मात्र दोन्ही संघांचा हा सामना जिंकून पहिल्याच झटक्यात अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Follow Us