14 वर्षीय Vaibhav Suryavanshi याचा धमाका, वेगवान शतक करणारा पहिला भारतीय, यूसुफ पठाणचा रेकॉर्ड ब्रेक

Vaibhav Suryavanshi Century : राजस्थान रॉयल्सच्या युवा वैभव सूर्यवंशी याने गुजरात टायटन्स विरुद्ध 'करो या मरो' अशा सामन्यात स्फोटक शतक झळकावलं. वैभवने या शतकासह अनेक रेकॉर्ड्स केले आहेत.

14 वर्षीय Vaibhav Suryavanshi याचा धमाका, वेगवान शतक करणारा पहिला भारतीय, यूसुफ पठाणचा रेकॉर्ड ब्रेक
Viabhav Suryavanshi Fastest Fifty By Indian Batters Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 28, 2025 | 10:54 PM

आयपीएल 2025 मधील 47 व्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला आहे. वैभवने सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे गुजरात टायटन्स विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना ऐतिहासिक शतक केलं आहे. वैभवने या शतकासह अनेक विक्रम रचले आहेत. वैभव आयपीएल इतिहासात वेगवान शतक करणारा सर्वात युवा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच वैभवने या शतकासह अनेक विक्रम केले आहेत. वैभवने अवघ्या 35 चेंडूत हे शतक केलं. वैभवने यासह यूसुफ पठाण याचा रेकॉर्ड ब्रेक केला.  यूसुफ पठाण याने 37 चेंडूत शतक झळकावलं होतं.

वैभवचं अर्धशतक ते शतक

वैभवने राजस्थानच्या डावातील पाचव्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर फोर ठोकला. वैभवने यासह आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं आणि ऐतिहासिक अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने अवघ्या 17 चेंडूत हे अर्धशतक केलं. वैभवने या खेळीतील 48 धावा या फक्त 9 चेंडूत षटकार आणि चौकारांच्या मदतीने केल्या. वैभवने 300 च्या स्ट्राईक रेटने 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने अर्धशतकापर्यंत मजल मारली. त्यानंतर वैभवने आणखी वेगाने धावा केल्या. वैभवने अर्धशतक ते शतक हा प्रवास हा अवघ्या 18 चेंडूत पूर्ण केला. वैभवने 285.71 च्या स्ट्राईक रेटने 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. वैभवचं हे या आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं.

वैभवचं विक्रमी शतक

वैभवने वयाच्या 14 वर्ष 32 व्या दिवशी ही शतकी खेळी केली. वैभव यासह आयपीएलमध्ये वेगवान शतक करणारा एकूण दुसरा तर पहिला भारतीय ठरला. ख्रिस गेल याने 2013 साली 30 चेंडूत शतक केलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी आता वैभवने ही कामगिरी करुन दाखवली. तसेच वैभवने 11 षटकारांसह आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. वैभव या स्पर्धेत एका डावात सर्वाधिक 11 षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

वैभवचं ऐतिहासिक शतक

राजस्थानसमोर 210 धावांचं आव्हान

दरम्यान गुजरातने राजस्थानसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. गुजरातसाठी कर्णधार शुबमन गिल आणि जोस बटलर या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. गिलने 84 धावांचं योगदान दिलं. तर बटलरने 50 धावांची खेळी केली. तर साई सुदर्शन याने 39 रन्स केल्या. या तिघांनी राजस्थानला 200 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली.