
आयपीएलच्या 18 व्या मोसामातील (IPL 2025) सहाव्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे. राजस्थानने कोलकाताला गुवाहाटातील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने हे आव्हान 17.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. क्विंटन डी कॉक हा केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला. क्विंटन डी कॉक याने केकेआरसाठी नाबाद 97 धावांची खेळी केली. तर अंगकृष रघुवंशी याने 22 धावांचं योगदान दिलं. कर्णधार अजिंक्य रहाणे याने 18 धावा केल्या. तर मोईन अलीने 5 रन्स केल्या. केकेआरचा हा या मोसमातील दुसऱ्या सामन्यातील पहिला विजय ठरला. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानला सलग दुसरा सामना गमवावा लागला.
कोलकाताने राजस्थानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. केकेआरने 152 धावांचं आव्हान हे 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. केकेआरने 17.3 ओव्हरमध्ये 153 धावा केल्या. क्विटंन डी कॉकर याने सर्वाधिक आणि नाबाद 97 धावांची खेळी केली. केकेआरचा हा या मोसमातील पहिला विजय ठरला.
कोलकाताला पहिल्या विजयासाठी 18 बॉलमध्ये 17 रन्सची गरज आहे. केकेकआरने 17 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 135 धावा केल्या आहेत. राजस्थानने केकेआरला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं आहे.
कोलकाताला दुसरा आणि मोठा झटका लागला आहे. कॅप्टन अजिंक्य रहाणे 18 धावांवर आऊट झााला आहे. वानिंदु हसरंगा याने अजिंक्यला तुषार देशपांडे याच्या हाती कॅच आऊट केलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
कोलकाताने पहिली विकेट गमावली आहे. मोईन अली 5 धावांवर रन आऊट झाला आहे.
कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. केकेआरकडून क्विंटन डी कॉक आणि मोईन अली सलामी जोडी मैदानात आली आहे. राजस्थानने केकेआरला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं आहे.
राजस्थानने कोलकाताला विजयासाठी 152 धावांंचं आव्हान दिलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 151 धावा केल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सने सातवी विकेट गमावली आहे. ध्रुव जुरेल 33 धावा करुन आऊट झाला आहे.
केकेआरने राजस्थानला सहावा धक्का दिला आहे. शुबम दुबे 9 रन्स करुन आऊट झाला आहे.
मोईन अली याने नितीश राणा याला 8 धावांवर बोल्ड केलंय. केकेआरने यासह राजस्थानला पाचवा झटका दिला.
कोलकाताने राजस्थानला चौथा झटका दिला आहे. वरुण चक्रवर्ती याने वानिंदू हसरंगा याला कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या हाती 4 धावांवर कॅच आऊट केलं.
राजस्थानने तिसरी विकेट गमावली आहे. कर्णधार रियान पराग याच्यानंतर ओपनर यशस्वी जयस्वाल 24 बॉलमध्ये 29 रन्स करुन आऊट झालाय.
राजस्थानने दुसरी विकेट गमावली आहे. कर्णधार रियान पराग आऊट झाला आहे. वरुण चक्रवर्ती याने रियानला 25 धावांवर विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्या हाती कॅच आऊट केलं.
कोलकाताने राजस्थानला पहिला झटका दिला आहे. वैभव अरोरा याने संजू सॅमसनला 13 रन्सवर बोल्ड केलं.
राजस्थान विरुद्ध कोलकाता सामन्याला सुुरुवात झाली आहे. कोलकाताने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन (इमपॅक्ट प्लेअर) ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात थोड्याच वेळात टॉस होणार आहे. कोणता संघ टॉस जिंकणार? याकडे दोन्ही संघांच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.
राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, संजू सॅमसन, कुणाल सिंग राठौर, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंग चरक, अशोक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात राजस्थान विरुद्ध कोलकाता आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. या सामन्याबाबत आपण प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.