AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs PBKS : पंजाबने राजस्थानविरुद्ध टॉस जिंकला, कॅप्टन श्रेयस अय्यरचा बॅटिंगचा निर्णय

Rajasthan Royals vs Punjab Kings Toss Ipl 2025 : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. हा सामना जयपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

RR vs PBKS : पंजाबने राजस्थानविरुद्ध टॉस जिंकला, कॅप्टन श्रेयस अय्यरचा बॅटिंगचा निर्णय
RR vs PBKS Toss Ipl 2025Image Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 18, 2025 | 4:26 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज रविवारी 18 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण 59 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स भिडणार आहेत. राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात अर्थात जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाबचं तर संजू सॅमसनकडे राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.  सामन्याला थोड्याच वेळात 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. पंजाबच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान रॉयल्समध्ये 2 बदल

राजस्थान रॉयल्सने या सामन्यात एकूण 2 बदल केले आहेत. संजू सॅमसन याची एन्ट्री झाल्याने नितीश राणा याला बाहेर बसावं लागलं आहे. तर जोफ्रा आर्चर याच्या जागी क्वेन माफाका याला संधी देण्यात आली आहे.

राजस्थान-पंजाब दुसऱ्यांदा आमनेसामने

राजस्थान विरुद्ध पंजाब या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी उभयसंघात 5 एप्रिल रोजी सामना झाला होता. तेव्हा राजस्थानने पंजाबवर 50 धावांनी मात केली होती. त्यामुळे आता पंजाब या पराभवाची परतफेड करुन प्लेऑफचं तिकीट मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राजस्थान रॉयल्स जिंकल्यास आरसीबीला फायदा

दरम्यान राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकल्यास थेट आरसीबीला फायदा होणार आहे. राजस्थान विजयी होताच तिथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरेल. त्यामुळे राजस्थान विरुद्ध पंजाब सामना फार महत्त्वाचा आहे.

पंजाब टॉसचा बॉस

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, वानिंदू हसरंगा, क्वेना माफाका, तुषार देशपांडे, आकाश मढवाल आणि फजलहक फारूकी

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, नेहल वढेरा, मिचेल ओवेन, अझमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

Follow Us
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?