Dwaine Pretorius retirement : क्रिकेट विश्वात दररोज अनेक युवा खेळाडूंचं पदार्पण होतंय. तर दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमस्वरुपी निवृत्ती घेतात. तर काही क्रिकेटपटू मात्र कसोटी किंवा टी 20 क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होतात. मात्र एका ऑलराउंडर क्रिकेटरने अजबच निर्णय घेतलाय. या ऑलराउंडरच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहते धक्क्यात आहेत. या ऑलराउंडरने लीग क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी चक्क आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा अर्थात निवृत्तीचा निर्णय घेतलाय. (rsa south africa star all rounder cricketer dwaine pretorius announced his retirement in international cricket)
दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर ड्वेन प्रिटोरियसने टी 20 आणि अन्य लहान झटपट स्वरुपातील क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. प्रिटोरियसने 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केलं होतं. प्रिटोरियसने आतापर्यंत 30 टी 20, 27 वनडे आणि 3 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलंय.
#Proteas all-rounder Dwaine Pretorius retires from international cricket ??
“I made one of the toughest decisions of my cricketing career. I have decided to retire from all forms of international cricket.” – Pretorius ?️
Full statement ? https://t.co/2MgXNFqePe#BePartOfIt pic.twitter.com/N4pX987Ktr
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 9, 2023
प्रिटोरियसने पाकिस्तान विरुद्ध 2021 मध्ये 17 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. प्रिटोरियस यासह दक्षिण आफ्रिकेकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वोतकृष्ट गोलंदाजीचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
“मी काही दिवसांपूर्वी क्रिकेट कारकीर्दीतील अनेक महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया प्रिटोरियसने आफ्रिकेकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
“मी आता माझ्या कारकीर्दीत टी 20 आणि इतर छोट्या प्रकारात लक्ष केंद्रीत करेन. दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणं हे माझ्या जीवनाचं एकमेव उद्दिष्ट होतं”, असं प्रिटोरियस म्हणाला.
प्रिटोरियसने 2 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. यूएईत 2021 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये प्रिटोरियसने 9 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 164.15 च्या स्ट्राईक रेटने 261 धावाही केल्या होत्या. तसेच प्रिटोरियस आयपीएलमध्ये चेन्नई, द हंड्रेडमध्ये वेल्श फायर, कॅरेबियन लीग आणि एसए 20 मध्ये डरबन सुपर जायंट्स अशा अनेक फ्रँचायजींचं प्रतिनिधित्व केलं आहे.