
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजयी अर्धशतकी खेळी केली. ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईचा हा तिसरा विजय ठरला. कोलकाताने विजयासाठी दिलेल्या 138 धावांचं आव्हान चेन्नईने ऋतुराजच्या नाबाद 67 धावांच्या जोरावर 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऋतुराजने या 67 धावांच्या खेळीत 9 चौकार ठोकले. ऋतुराजने चेन्नईला विजय मिळवून देण्यासाह कॅप्टन म्हणून खास रेकॉर्ड केला आहे.
ऋतुराज चेन्नई सुपर किंग्सकडून गेल्या 5 वर्षात अर्धशतक करणारा पहिला कर्णधार ठरला. ऋतुराजच्या आधी महेंद्रसिंह धोनी याने ही कामगिरी केली होती. ऋतुराजने कोलकाता विरुद्ध 45 बॉलमध्ये 111.11 च्या स्ट्राईक रेटने 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. ऋतुराजला या अर्धशतकी खेळीसह अखेर सूर गवसला. महेंद्रसिंह धोनी याने कॅप्टन्सी सोपल्यानंतर ऋतुराजला मोठी खेळी करता आली नाही. मात्र अखेर ऋतुराजने होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियममध्ये अर्धशतक ठोकलं आणि विजयही मिळवून दिला.
दरम्यान चेन्नईचा हा 5 सामन्यांमधील तिसरा विजय ठरला. तर 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये 6 पॉइंट्ससह चौथ्या स्थानी आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा +0.666 इतका आहे. चेन्नई आता आपला पुढील सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध 14 एप्रिल रोजी खेळणार आहे. हा सामना हायव्होल्टेज असा असणार आहे.
ऋतुराज गायकवाड याचं ऐतिहासिक शतक
Skipper leading from the front 🫡
Ruturaj Gaikwad brings 🆙 his maiden 5️⃣0️⃣ of #TATAIPL 2024 👏👏
Follow the Match ▶ https://t.co/5lVdJVscV0 #CSKvKKR | @ChennaiIPL pic.twitter.com/9TJXQHTDcR
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2024
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.