SA vs IND Test Series | टीम इंडियाला मोठा धक्का, कसोटी मालिकेतून मोहम्मद शमीनंतर स्टार ओपनर आऊट!

South Africa vs India Test Series | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रेकि विरुद्ध कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. नक्की काय झालंय जाणून घ्या.

SA vs IND Test Series | टीम इंडियाला मोठा धक्का, कसोटी मालिकेतून मोहम्मद शमीनंतर स्टार ओपनर आऊट!
| Updated on: Dec 22, 2023 | 5:19 PM

मुंबई | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 78 धावांनी विजय मिळवत मालिका जिंकली. टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात ही सीरिज जिंकली. या एकदिवसीय मालिकेनंतर उभयसंघात कसोटी मालिका पार पडणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही मालिका असून दिग्गज खेळाडू कमबॅक करणार आहे. टीम इंडियाकडून नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली परतणार आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा हा कमबॅक करणार आहे.

या मालिकेसाठी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेने टीम जाहीर केली आहे. या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियातून या मालिकेआधी मोहम्मद शमी हा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यानंतर टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा युवा सलामीवीर दुखापतीमुळेबाहेर पडलाय. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडणार आहे. ऋतुराजच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला कसोटी मालिकेला मुकावं लागणार आहे.

ऋतुराज गायकवाड याला दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली. ऋतुराजला याच दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही खेळता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा विराट कोहली हा अचानक टीम इंडियाची साथ सोडून भारतात परतला आहे. कौटुंबिक कारणामुळे विराट माघारी आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र विराट लवकरच टीम इंडियासह जोडला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

तर तिथे काही दिवसांपूर्वी विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याने वैयक्तिक कारणामुळे कसोटी मालिकेतून माघार घेतल्याची माहिती बीसीसीआयने दिली. त्यामुळे ईशान किशन याच्या जागी बीसीसीआयने केएस भरत याला संधी दिली.

ऋतुराजला दुखापत

दक्षिण आफ्रिका-टीम इंडिया यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा 26 ते 30 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरा सामना हा 3 ते 7 जानेवारी दरम्यान केप टाऊनमध्ये पार पडेल. या कसोटी मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं आणि टेम्बा बवुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा आणि केएस भरत (विकेटकीपर).