AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2027 स्पर्धेत खेळणार की नाही! महेंद्रसिंह धोनीने घेतला असा निर्णय

महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून कधीच निवृत्ती घेतली आहे. आता फक्त आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. त्यात त्याचं वय आणि दुखापत पाहता अजून किती वर्षे खेळणार हा प्रश्न आहे. असं असताना आयपीएल 2027 स्पर्धेत खेळणार का? असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.

आयपीएल 2027 स्पर्धेत खेळणार की नाही! महेंद्रसिंह धोनीने घेतला असा निर्णय
आयपीएल 2027 स्पर्धेत खेळणार की नाही! महेंद्रसिंह धोनीने घेतला असा निर्णय Image Credit source: Getty Images
| Updated on: Sep 03, 2026 | 5:13 PM
Share

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी आता सात महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी सर्वच फ्रेंचायझींनी मोर्चेबांधणी केली आहे. पण चेन्नई सुपर किंग्स संघात काय बदल होणार? याची उत्सुकता कमालीची  वाढली आहे.  कारण मागच्या तीन पर्वात संघाची कामगिरी सुमार राहिली आहे. त्यामुळे खेळाडूंची ट्रेडिंग होत आहे. इतकंच काय तर मिनी लिलावातही काही खेळाडूंवर नजर लागून आहे. पण महेंद्रसिंह धोनी या पर्वात खेळणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. मागच्या पर्वात दुखापतीमुळे महेंद्रसिंह धोनी खेळला नव्हता. आता त्याच्या बाबत क्रीडावर्तुळात चर्चाही रंगल्या आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघात शेअर मागितला होता. पण त्याला व्यवस्थापनाने नकार दिल्याने धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात बिनसल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनी या स्पर्धेत खेळला तरी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून असेल की खेळाडू म्हणून.. हा देखील प्रश्न आहे. असं असताना चेन्नईसाठी खेळलेल्या माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथने खुलासा केला की, धोनी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळू इच्छित नाही.

एस बद्रीनाथने युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘महेंद्रसिंह धोनीने मला सांगितलं होतं की, इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार नाही. तो स्वत:ला एक फुल टाईम कीपर म्हणून पाहू इच्छित आहे. म्हणजेच मैदानात 20 षटकं थांबू इच्छित आहे. यासाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळू इच्छित नाही. पण मला वाटतं की जर त्याने असं केलं तर यामुळे चेन्नई सुपर किंग्सला फायदा होईल.’ बद्रीनाथच्या मते, धोनी डावाच्या शेवटी फलंदाजीला येतो. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून चेन्नई सुपर किंग्सला फायदा होऊ शकतो. यामुळे संघाला धोनीचा अनुभव आणि फिनिशिंग क्षमतेचा लाभ मिळेल. त्यामुळे शरीरावर येणारा ताणही कमी होऊ शकतो.

आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर त्याचा संघातील भूमिका संकुचित राहिली. पण आता 20 षटकं विकेटकीपिंग करण्याचा मानस असल्याने संघाला नक्कीच त्याला फायदा होईल. बद्रीनाथने सांगितलं की, धोनीचं शरीर त्याला खूप वेळ साथ देत नाही असं फ्लेमिंग म्हणाला होता. पण बद्रीनाथच्या मते, धोनीने 16व्या षटकानंतर बॅटिंग करेल आणि नंतर विकेटकीपिंग करेल. धोनी 45 वर्षांचा असून फिटनेसचा त्रास आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...