AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs PAK Live Streaming : दक्षिण आफ्रिका विजयी पंचसाठी सज्ज, पाकिस्तान रोखणार?

South Africa vs Pakistan Womens World Cup 2025 Live Match Score : पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला विजय मिळवायचा असेल तर सलग 4 सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव करावा लागेल. त्यामुळे पाकिस्तान हा सामना जिंकणार की त्यांची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम राहणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

SA vs PAK Live Streaming : दक्षिण आफ्रिका विजयी पंचसाठी सज्ज, पाकिस्तान रोखणार?
SA vs PAK Live StreamingImage Credit source: Icc and @ProteasWomenCSA X Account
| Updated on: Oct 20, 2025 | 11:26 PM
Share

आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील सहावा सामना असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत सलग आणि एकूण 4 सामने जिंकले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे अजिंक्य विरुद्ध अपयशी असा हा सामना असणार आहे. या सामन्याबाबत आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना मंगळवारी 21 ऑक्टोबरला होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांन टॉस होईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेला रोखणार?

दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना औपचारिकता आहे. मात्र त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा हा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखण्यासह नेट रनरेट आणि सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने जोरदार कमबॅक करत विजयी चौकार लगावला. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड, इंडिया, बांगलादेश आणि श्रीलंकेला पराभूत केलं आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. आता दक्षिण आफ्रिकेचा मंगळवारी पाकिस्तानला पराभूत करत विजयी पंच लगावण्याचा प्रयत्न असणार आहे.

तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान 5 सामन्यानंतरही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. पाकिस्तानचा पहिल्या 3 सामन्यांमध्ये पराभव झाला. तर पाकिस्तानचा चौथा आणि पाचवा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिला विजय मिळवणार का? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anana Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी.

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक