AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar: T20 World Cup मध्ये भारतीय खेळाडूंच नेमकं काय चुकतंय?, सचिन तेंडुलकरचा संघाला महत्त्वाचा सल्ला

T20 World Cup: यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) भारतासाठी अतिशय निराशाजनक सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यातही भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवलं.

Sachin Tendulkar: T20 World Cup मध्ये भारतीय खेळाडूंच नेमकं काय चुकतंय?, सचिन तेंडुलकरचा संघाला महत्त्वाचा सल्ला
सचिन तेंडुलकरच्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये ना कोहली ना धोनी
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 5:54 PM
Share

T20 World Cup 2021 : भारतीय संघाचं टी20 विश्वचषकात (T20 World Cup) पुढील फेरीत पोहोचणं फार अवघड झालं आहे. उर्वरीत सामन्यात मोठ्या विजयांसह न्यूझीलंडचा अफगाणिस्ताकडून पराभव अशा दोन आशांवर भारताचं पुढील फेरीत जाणं अवंलंबून आहे. पण तूर्तास तरी भारताच्या या खराब कामगिरीबाबत सर्वच क्रिकेट जगतातून प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही काही सल्ले देत भारतीय खेळाडूंची काय चूक होत आहे? हे सांगितलं आहे.

भारताने आधी पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सनी पराभव पत्करला. त्यानंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी भारताला नमवलं आहे. पहिल्या सामन्यात भारत किमान दीडशेचा आकडा पार करु शकला होता. पण न्यूझीलंडविरुद्ध तर केवळ 110 पर्यंतच भारतीय संघ पोहचू शकला. याचे कारण सांगताना सचिनने भारतीय फलंदाजांचं फिरकीपटूंसमोरचं खराब प्रदर्शन हे सांगितलं आहे. पूर्वीपासून अव्वल दर्जाच्या फिरकीपटूंचा देश म्हणून प्रसिद्ध भारतीय संघ फिरकीविरुद्ध उत्तम खेळतो अशा समज होती. पण यंदाच्या विश्वचषकात भारतीय फलंदाज फिरकीपटूंसमोरचं नांगी टाकत आहेत.

न्यूझीलंडच्या फिरकीसमोर भारत गारद

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची कमी धावसंख्या होण्यामागे संघाने अधिक डॉट बॉल खेळले हे कारण होते. यावेळी हित शर्मा, विराट कोहली या दिग्गजांनी लेग स्पीनर इश सोढीसमोर विकेट टाकली. तर न्यूझीलंड्च्या सँटनरनेही उत्तम फलंदाजी करत केवळ 15 धावा दिल्या. या दोघांनी 48 चेंडूत केवळ 32 धावाच दिल्या. याचबद्दल सांगताना सचिनने भारतीय फलंदाजांना फिरकी गोलंदाजीसमोर आणखी सरावाची गरज असल्याचा सल्ला दिला आहे.

पावरप्लेमध्ये विकेट घेणे आवश्यक

यानंतर गोलंदाजीबद्दल बोलताना सचिन म्हणाला,’समोरच्या संघाला आपण कमी आव्हाने दिले असताना सुरुवातीच्या काही षटकात उत्तम गोलंदाजी करणं सर्वात महत्त्वाचं असतं. सुरुवातीच्या 6 ओव्हर पावरप्ले असताना किमान 3 विकेट घेण्याचा प्रयत्न करणं अगदी गरजेचं असतं. पण न्यूझीलंडविरुद्ध केवळ बुमराहने पावरप्लेमध्ये एक विकेट घेतली. त्याला योग्य साथ न मिळाल्याने भारत डिफेन्डीग करु शकला नाही.’

इतर बातम्या

India vs New zealand 2021: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट, रोहित नव्हे दुसऱ्याच खेळाडूकडे संघाची धुरा?

T20 World Cup 2021: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘राशिद’ नावाचा खतरा, दिग्गज भारतीय खेळाडूंनाही फुटतो घाम

T20 World Cup 2021: श्रीलंकेविरुद्ध विजयामुळे मॉर्गनने तोडला धोनीचा रेकॉर्ड, इंग्लंड सेमीफायनलमध्ये दाखल

(Sachin Tendulkar advice team india for improve certain things including attack against leg spinner)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.