AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी अपडेट! बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सचिन तेंडुलकर? अखेर खरं काय ते समोर आलं

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. रॉजर बिन्नी यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केल्यानंतर पदावरून पायउतार झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सचिन तेंडुलकरच्या नावाची चर्चा रंगली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

मोठी अपडेट! बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सचिन तेंडुलकर? अखेर खरं काय ते समोर आलं
मोठी अपडेट! बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सचिन तेंडुलकर? अखेर खरं काय ते समोर आलंImage Credit source: PTI
| Updated on: Sep 11, 2025 | 8:38 PM
Share

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय ही जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड गणलं जाते. त्यामुळे या संस्थेचा अध्यक्ष असणं ही मानाची बाब आहे. अनेक दिग्गजांनी हे पद भूषवलं आहे. 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी शेवटचे अध्यक्ष होते. वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हे पद सोडलं. बिन्नी यांनी 2022 साली या पदाचा कार्यभार सांभाळला होता. जवळपास तीन वर्षे त्यांनी ही भूमिका बजावली. आता त्यांच्या नवा अध्यक्ष कोण याची चर्चा रंगली आहे. कारण बीसीसीआयच्या अध्यक्ष हा क्रिकेटपटूच असेल स्पष्ट आहे. त्यामुळे क्रिकेटपटूच्या नावाची चर्चा रंगली. काही रिपोर्टनुसार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या पदावर विराजमान होईल असं सांगण्यात येत होतं. पण सचिन तेंडुलकरने एका झटक्यात या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. तसेच या चर्चा निव्वल अफवा असल्याचं सांगितलं आहे.

सचिन तेंडुलकरची मॅनेजमेंट कंपनीने एक निवेदन देत स्पष्ट केलं की, ‘आम्हाला कळलं की सचिन तेंडुलकर यांचं नाव बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे तसेच त्यांच्या नावाचा विचार केला जात असल्याच्या बातम्या आणि अफवा समोर येत आहेत. पण आम्ही स्पष्ट करतो की, असं काहीच नाही. आम्ही संबंधित चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट करतो आणि त्याकडे लक्ष देऊ नका अशी विनंती करतो.’ दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या पुढील अध्यक्ष म्हणून एका मोठ्या भारतीय क्रिकेटपटूच्या शोधात आहे. सध्या राजीव शुक्ला हे तीन महिन्यांसाठी कार्यवाहक अध्यक्ष आहेत.

सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी हे पद भूषवलं आहे. त्यामुळे असंच मोठं नाव पुढे येईल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी करत आहेत. बीसीसीआयच्या अनेक भागधारकांना नवीन अध्यक्ष हा भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारा माजी क्रिकेटपटू असावा असे वाटते. भारतीय संघातून निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूचा यासाठी विचार होईल यात काही शंका नाही. सप्टेंबर 2025 च्या अखेरीस होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन अध्यक्षाची निवड हा एक प्रमुख मुद्दा असेल.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...